India Pakistan War : भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांना भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान गोंधळला आहे. पाकिस्तानाकडून सीमेलगतच्या 15 शहरांवर ड्रोनच्या सहाय्याने हल्ला केला मात्र हे ड्रोन हवेतच नष्ट करण्यात आले. दरम्यान, युद्धचा भडका कधीही उठेल, अशी चर्चा आहे. त्यामुळे गॅस, पेट्रोलचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, ही भीती अनाठायी आहे.
भारतात पेट्रोल, डिझेल, गॅस तसेच अन्य इंधनांचा साठा मुबलक आहे. त्यामुळे घाबरून खरेदीकरण्यासाठी गर्दी करू नका, असे आवाहन 'इंडियन ऑयल'ने केले आहे. ट्विटरवर पोस्ट करत इंडियन ऑयल हे आवाहन केले आहे.
इंडियन ऑईलकडे देशभरात इंधनाचा मुबलक साठा आहे आणि आमच्या पुरवठा लाईन्स सुरळीतपणे चालू आहेत. घाबरून जात खरेदी करण्याची कोणतीही गरज नाही, आमच्या सर्व आउटलेट्सवर इंधन आणि एलपीजी सहजपणे उपलब्ध आहे, असे आपल्या ट्विटमध्ये इंडियन ऑईलने म्हटले आहे.
पाकिस्ताने गुरुवारी रात्री आणि आज (शुक्रवारी) सीमेजवळ गोळीबार केला. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या गोळीबाराला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. भारतीय लष्कराने पाकिस्तानचे 50 ड्रोन तसेच तीन लढाऊ विमानं पाठल्याची माहिती आहे. एक पायलट देखील भारताच्या ताब्यात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पायलट ताब्यात असल्याबाबत भारतीय लष्कराकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
भारतावर हल्ला करणाऱ्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती चिंताजनक आहे. पाकिस्तान सरकारने ट्विट करत त्यांच्या भागीदारी देशांना कर्ज देण्याचे आवाहन केले आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे पुरेस पैसे नसल्याचे देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मात्र, पाकिस्तान सरकारचे हे अकाऊंट हॅक झाले असून हॅकरकडून असे ट्विट करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.