इस्लाम सोडून वसीम रिझवी यांनी स्वीकारला हिंदू धर्म; मृत्यूपत्रातच दिले होते संकेत...

रिझवी हे शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष आहेत.
Wasim Rizvi
Wasim RizviSarkarnama
Published on
Updated on

गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रमुख मुस्लिम चेहऱ्यांपैकी एक असलेल्या वसीम रिझवी (Wasim Rizvi) यांनी सोमवारी सकाळी इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांनी रिझवी यांना सनातन धर्मात प्रवेश करवून घेतला. रिझवी यांनी काही दिवसांपूर्वी जारी केलेल्या मृत्यूपत्रातच याबाबत संकेत दिले होते. मृत्यूनंतर आपल्या मृतदेहाचे दफन न करता दहन करावे, असं त्यांनी म्हटलं होतं.

वसिम रिझवी हे मागील काही वर्षांपासून कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर होते. त्यांनी अनेक वाद ओढवून घेतले होते. शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे ते माजी अध्यक्ष आहेत. हिंदू धर्मात प्रवेश केल्यानंतर ते म्हणाले, मला इस्लाममधून बाहेर काढण्यात आले आहे. माझ्यावर दर शुक्रवारी ईनामाची रक्कम वाढवली जाते. त्यामुळे आज मी सनातन धर्म स्वीकारत आहे. इथे धर्मपरिवर्तनाचा प्रश्नच नाही.

Wasim Rizvi
खासदाराच्या सुचक ट्विटनंतर शशी थरूर यांनी दिला राजीनामा

मला इस्मालमधून काढल्यानंतर मी कोणता धर्म स्वीकारावा ही माझी मर्जी आहे. हिंदू धर्म जगातील सर्वात पहिला धर्म आहे. या धर्माइतक्या चांगल्या गोष्टी अन्य कोणत्याही धर्मात नाहीत. इस्लामला मी धर्मच मानत नाही. दर शुक्रवारी नमाजानंतर माझ्या शिर धडावेगळे करण्याचे फतवे काढले जातात. अशा स्थितीत मला कोणी मुसलमान म्हटले तर मला स्वत:लाच शरम वाटते, असे रिझवी म्हणाले.

रिझवी यांनी काय म्हटलंय मृत्यूपत्रात?

रिझवी यांनी काही दिवसांपूर्वीच आपलं मृत्यूपत्र सार्वजनिक केलं होतं. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, माझ्या मृत्यूनंतर मृतदेहाचे दफन न करता दहन केले जावे. हिंदू प्रथा-परंपरेनुसार अंत्यसंस्कार करावेत. यति नरसिंहानंद यांनी आपल्या चितेला अग्नी द्यावा, असंही त्यांनी म्हटले आहे.

कुराणातील 26 आयत काढून टाकण्यासाठी याचिका

वसीम रिझवी यांनी कुराणातील 26 आयत काढून टाकण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती. तेव्हापासून कट्टरपंथी मुस्लिमांच्या ते निशाण्यावर आहेत. रिझवी हे मुस्लिम विरोधी संघटनांचे एजंट असल्याचा आरोपही काही संघटनांकडून केला जातो. रिझवी यांनी काही दिवसांपूर्वी एका व्हिडीओतून आपल्याला ठार मारण्याचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोपही केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com