Water Leakage in New Parliament: Video पार्लमेंटला गळती! संसदेच्या बाहेर पेपर लीक...,संसदेमध्ये पाणी लीक; नेमकं काय घडलं?

Paper leak outside water leakage inside Congress MP Manickam Tagore: 'संसदेच्या बाहेर पेपर लीक होत आहेत आणि संसदेमध्ये पाणी लीक होत आहे. राष्ट्रपतींचा वावर असलेल्या संसदेच्या लॉबीमध्ये पाणी गळती होत आहे.
Water Leakage in New Parliament
Water Leakage in New ParliamentSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली (New Delhi) येथे नव्या संसद भवनाची (Parliament Building) भव्यदिव्य अशी इमारत उभारण्यात आली. या इमारतीचा उद्धघाटन सोहळा आपण पाहिला. सध्या संसद भवनात अधिवेशन सुरु आहे. पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना विरोधक झोडपून काढत असतानाच संसद भवनाला गळती लागल्याची माहिती समोर येत आहे.

काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी सोशल मीडियावर पोस्ट याबाबत व्हिडिओ शेअर केला आहे. 'संसदेच्या बाहेर पेपर लीक होत आहेत आणि संसदेमध्ये पाणी लीक होत आहे. राष्ट्रपतींचा वावर असलेल्या संसदेच्या लॉबीमध्ये पाणी गळती होत आहे. यावर तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. नवी इमारत बांधून नुकतेच एक वर्षे झाले आहे. त्यामुळे हा मुद्दा संसदेमध्ये उपस्थित करणार आहे.'

संसदेतील पाणीगळतीचा व्हिडीओ विरोधी पक्षाच्या अनेक खासदारांनी शेअर केला आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करून फक्त ‘नई संसद’ अशा दोन शब्दांत पोस्ट केली आहे. काँग्रेस खासदार मनिकम टागोर यांनी पाणीगळतीचा व्हिडीओ शेअर करून संसदेत स्थगन प्रस्ताव सादर केला आहे. व्हिडीमध्ये संसदेच्या नव्या इमारतीमध्ये पाणीगळती होत असल्याचे दिसत आहे. त्यासाठी खाली बादली ठेवून ते पाणी जमा केलं जात आहे.

Water Leakage in New Parliament
Rahul Shewale Defamation Case: राहुल शेवाळेंची मानहानी करणं उद्धव ठाकरे, राऊतांना भोवलं; 2 हजारांचा दंड

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com