शिंदे गटातील माजी खासदार राहुल शेवाळे यांची मानहानी केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना 2 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
मानहानीच्या दाव्यातून आरोपमुक्त करण्यासाठी,ठाकरे आणि राऊत यांनी न्यायालयात अर्ज केला होता. त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी विलंब झाल्याने दोन्ही नेत्यांनी विशेष न्यायालयात अर्ज केला होता.
न्यायालयाने दोन हजार रुपये दंड ठोठावून तो दहा दिवसांत जमा करण्याचे आदेश ठाकरे आणि राऊत यांना दिले आहे. मानहानीच्या खटल्यातील विलंब माफ करण्यासाठी 1 हजार रुपये अतिरिक्त दंड ठोठावताना एकत्रित 2 हजार रुपये दोन आठवड्यांत जमा करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाचे आदेश
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये आपल्याबद्दल बदनामीकारक मजकूर छापण्यात आल्याचा आरोप शिवसेना (शिंदे गट) माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केला होता. यानंतर शेवाळे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीची याचिका दाखल केली होती. याप्रकरणी काही महिन्यापूर्वी ठाकरे आणि खासदार राऊतांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' मध्ये एक लेख प्रसिद्ध झाला होता. यामध्ये आपल्याबाबत बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यात आला असल्याची तक्रार न्यायालयात राहुल शेवाळे यांनी केली होती. 29 डिसेंबर 2022 ला हा लेख प्रसिद्ध करण्यात आला होता, असा दावा शेवाळेंकडून करण्यात आलेला आहे. या प्रकरणात उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी दोषमुक्तीसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
यापूर्वी झालेल्या सुनावणीत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा दोषमुक्तीचा अर्ज मेंटेनेबल नाही, असा दावा राहुल शेवाळे यांच्या वकिलांने केला. राहुल शेवाळे हे शिवसेनेत 30 वर्षे होते, त्यामुळे आता त्यांना टार्गेट केले जात आहे, असाही दावा शेवाळे यांच्या वकिलांनी केला होता. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी शेवाळे यांच्या वकिलाने केलेला दावा खोडून काढला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.