kamal haasan News : मोठी बातमी : अभिनेता कमल हासन यांच्या MNM पक्षाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण..?

MNM News : पक्षाच्या टि्वट हॅडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे.
kamal haasan, Rahul Gandhi
kamal haasan, Rahul Gandhi sarkarnama
Published on
Updated on

MNM News :‘मक्कल निधी मय्यम’ (MNM) पक्षाचे अध्यक्ष दक्षिणात्य सुपरस्टार, अभिनेता कमल हासन यांनी दोन दिवसापूर्वी काँग्रेसला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. तामिळनाडू (tamilnadu) मधील पूर्व इरोड या विधानसभा मतदारसंघाचीही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला कमल हासन यांच्या पक्षाने पाठिंबा दिला आहे. (makkal needhi maiam news update)

या पाठिंबानंतर हासन यांचा ‘मक्कल निधी मय्यम’(makkal needhi maiam) पक्षाची वेबसाईट हॅक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाच्या टि्वट हॅडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे.

kamal haasan, Rahul Gandhi
MNM News : कमल हासन यांचा मोठा निर्णय ; पोटनिवडणुकीत 'या' पक्षाला पाठिंबा

"काही समाजकंठकांनी आमची बेवसाईट हॅक केली असली तरी आम्ही त्यांच्या अशा धमक्यांना घाबरत नाही, त्यांना सडेतोड उत्तर देऊ," असे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले.

‘मक्कल निधी मय्यम’ची अधिकृत वेबसाईट हॅक केल्यानंतर त्यावर ‘मक्कल निधी मय्यम’या पक्षाचे काँग्रेसमध्ये ३० जानेवारी रोजी विलिनीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या पोस्टनंतर अनेकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. यामुळे पक्षाचे कार्यकर्ते संतापले आहेत. काही काळानंतर ही पोस्ट वेबसाईटवरुन हटविण्यात आली. पक्षाच्या प्रवक्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. काँग्रेसमध्ये पक्षाचे विलिनीकरण होणार ही अफवा असल्याचे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले.

kamal haasan, Rahul Gandhi
NCP News : शिंदेच्या कमी लोकप्रियतेवरुन राष्ट्रवादीनं डिवचलं ; 'ठाकरेंच्या तुलनेत..

काही वर्षांपूर्वी कमल हासन यांनी राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी ‘मक्कल निधी मय्यम’ (MNM) या पक्षाची स्थापना केली आहे. मात्र २०१९ च्या लोकसभा आणि २०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला सपाटून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

२०२१ च्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून कमल हासन यांच्या एमएनएम पक्षाने ९००० मते मिळवली होती. ही मते आता काँग्रेसकडे वळती होतील, अशी आशा काँग्रेसला वाटते.

कमल हासन यांची त्यांच्या पक्षातील हुकुमशाही, स्वतःच्या प्रतिमेभोवतीच राजकारण याला कंटाळून पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते पक्षाला सोडून गेले आहेत. त्यामुळे कमल हासन यांचा काँग्रेससोबत आघाडीचा हा प्रयत्न त्यांच्या पक्षाला तारणार का? हे लवकरच समजेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com