kamal haasan News : अभिनेते कमल हासन (kamal haasan) हे काही दिवसापूर्वी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. ते काँग्रेसमध्ये जाणार अशा प्रकारच्या चर्चा तेव्हा रंगल्या होत्या. आता पुन्हा कमल हासन यांनी काँग्रेसशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असल्याचे चित्र आहे.
देशातील विविध राज्यांमध्ये पोटनिवडणुका २७ फेब्रुवारी रोजी होत आहेत. तामिळनाडू (tamilnadu)मधील पूर्व इरोड या विधानसभा मतदारसंघाचीही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला कमल हासन यांच्या पक्षाने पाठिंबा दिला आहे.
निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शविला आहे. याआधीच्या दोन्ही निवडणुकात स्वबळावर निवडणूक लढविणारे कमल हासन यांचे लक्ष आता युती आणि आघाडीकडे लागले असल्याचे यामधून दिसत आहे.
काही वर्षांपूर्वी कमल हासन यांनी राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी ‘मक्कल निधी मय्यम’ (MNM) या पक्षाची स्थापना केली आहे. मात्र २०१९ च्या लोकसभा आणि २०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला सपाटून पराभवाचा सामना करावा लागला आहे.
कमल हासन यांची त्यांच्या पक्षातील हुकुमशाही, स्वतःच्या प्रतिमेभोवतीच राजकारण याला कंटाळून पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते पक्षाला सोडून गेले आहेत. त्यामुळे कमल हासन यांचा काँग्रेससोबत आघाडीचा हा प्रयत्न त्यांच्या पक्षाला तारणार का? हे लवकरच समजेल.
या दोन्ही निवडणुकात त्यांनी स्वबळावर लढल्या होत्या. कमल हासन यांना दोन्ही निवडणुकीत पराभव सहन केल्यानंतर यांचे लक्ष आता अन्य पक्षाची युती आणि आघाडीकडे लागले असल्याचे दिसते. म्हणून त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याची चर्चा आहे.
पूर्व इरोडचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार एलंगोवन यांना कमल हासन यांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ही जागा जिंकणे काँग्रेसला सोप्पे झाल्याचे बोलले जाते.
२०२१ च्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून कमल हासन यांच्या एमएनएम पक्षाने ९००० मते मिळवली होती. ही मते आता काँग्रेसकडे वळती होतील, अशी आशा काँग्रेसला वाटते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.