हत्या काँग्रेस नगरसेवकाची अन् विधानसभेत गोंधळ घातला भाजपनं

पश्चिम बंगालमध्ये रविवारी दोन नगरसेवकांच्या हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यापैकी एक नगरसेवक काँग्रेस व दुसरा तृणमूल काँग्रेसचे आहेत.
BJP in West Bengal
BJP in West BengalSarkarnama

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) रविवारी दोन नगरसेवकांच्या (Corporator) हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यापैकी एक नगरसेवक काँग्रेस (Congress) व दुसरा तृणमूल काँग्रेसचे (TMC) आहेत. या मुद्यावरून भाजपने सोमवारी विधानसभेत जोरदार गोंधळ घातला. लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेच्या मुद्यावरून भाजपकडून (BJP) विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणला होता. त्यानंतर सर्व आमदारांनी कामकाजावर बहिष्कार टाकत वॉकआऊट केले.

पश्चिम बंगालमधील पानीहाटी आणि झालदा परिसरात या घटना घडल्या आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर-24 परगणा जिल्ह्यातील पानाही नगरपालिकेतील तृणमूलचे नगरसेवक अनुपम दत्ता (Anupam Dutta) यांची हत्या झाली आहे. दुसऱ्या घटनेमध्ये काँग्रेसचे नगरसेवक तपण कंडू (Tapan Kandu) यांची हत्या झाली आहे. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं. आहे.

BJP in West Bengal
खळबळजनक : एकाच दिवशी दोन नगरसेवकांची गोळ्या घालून हत्या

राज्यात आसनसोल लोकसभा मतदारसंघ आणि बालीगंज विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. यापार्श्वभूमीवर भाजपकडून पुन्हा एका हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. विधानसभेमध्ये भाजपने हा मुद्दा उचलून धरत सरकारला धारेवर धरलं. स्थगन प्रस्ताव सादर करून भाजप आमदारांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बोलण्याची विनंती भाजपकडून करण्यात आली. पण हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. त्यामुळे संतापलेल्या आमदारांनी सभात्याग केला.

पश्चिम बंगालमध्ये दोन नगरसेवकांच्या हत्येवर आम्हाला मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्याकडून उत्तर हवं आहे. राज्यात जर नगरसेवकांची हत्या होत असेल, तर सामान्य जनतेची काय होत असेल? अशा स्थितीत सामान्य जनता कुणाकडे जाईल? राज्यात कायद्यात राज्य नसून एक शासक बसल्याचे न्यायालयानेही म्हटलं होतं, अशी टीका भाजप नेत्या अग्निमित्रा पॉल यांनी केली.

भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजूमदार यांनी तृणमूलवर टीका केली आहे. टीएमपीसीची वाटचाल 1972-77 मधील काँग्रसेच्या काळासारखी सुरू आहे. लोकप्रतिनिधींची अशाप्रकारे हत्या होत असेल तर सर्वसामान्य लोकांचं काय होत असेल? केंद्र सरकारनेही याची दखल घ्यायला हवी. आम्ही लोकसभेतही याबाबत आवाज उठवू, असं मुजूमदार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com