दे धक्का! महापालिका अन् नगरपालिका निवडणुकांत भाजप, काँग्रेसची धूळधाण

राज्यात 108 महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले होते.
BJP and Congress
BJP and Congress Sarkarnama
Published on
Updated on

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांचे (Civic Polls) निकाल लागत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी या निवडणुकीत विरोधकांना धूळ चारली आहे. काँग्रेस (Congress), भाजपसह (BJP) डाव्यांना (CPIM) मोठा धक्का बसला असून, 108 महापालिका आणि नगरपालिकांपैकी एकाही ठिकाणी विरोधकांना आघाडी मिळवता आलेली नाही.

राज्यात 108 महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले होते. या निवडणुकीत एकूण 2 हजार 171 जागा आहेत. त्यातील तब्बल 994 जागा तृणमूलने जिंकल्या आहेत. याचबरोबर तृणमूलने 456 जागांवर आघाडी घेतली आहे. याचवेळी अपक्षांनी 83 जागा मिळवल्या आहेत. भाजपला 46 जागा जिंकता आल्या आहेत. काँग्रेसला 32 तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 20 जागा मिळाल्या आहेत. भाजप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस हे एकाही महापालिका अथवा नगरपालिकेत आघाडीवर नाहीत.

BJP and Congress
राजकारण तापलं! पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आखाड्यात बच्चू कडूंची एंट्री

राज्यात नुकत्याच झालेल्या विधाननगर, सिलिगुडी, चंदननगर आणि असनसोल या चार महापालिकांत तृणमूलने सत्ता मिळवली होती. चारही महापालिकांत तृणमूलने बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळवून भाजप, काँग्रेससह डाव्या पक्षांना धूळ चारली होती. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) ऐतिहासिक विजय मिळवत ममता बॅनर्जी यांनी सत्ता मिळवली. या निवडणुकीत भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली होती. ममतांनी विधानसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळत विरोधकांना धूळ चारली होती. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसने बाजी मारत कोलकता महापालिकेत मोठा विजय मिळवला होता. त्यामुळे आता आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com