पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) निवडणुकीत आम आदमी पार्टी (AAP) आणि प्रहार जनशक्ती पक्ष हे दोन नवे भिडू उतरत आहेत. आपने पुणे महापालिकेची निवडणूकही स्वबळावर लढविण्याचे जाहीर केले आहे. पिंपरीत,तर त्यांनी निवडणूक जाहीर होण्याआधीच प्रचाराचा नारळही फोडला आहे. आता राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचा प्रहारही पिंपरीत १५-२० जागा लढविणार आहे. मात्र, ते आघाडीच्या मनस्थितीत आहेत.
आपप्रमाणे प्रहारनेही पिंपरीत खाते खोलू, असा दावा केला आहे. कडू हे स्वत: प्रचाराला येणार असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष विनोद गायकवाड यांनी आज 'सरकारनामा'ला सांगितले. ते कडू यांच्या कालच्या शहर भेटीनंतर बोलत होते. प्रहार संघटनेचे २०१८ ला पक्षात रुपांतर झाले. सध्या कडू हे शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री आहेत.त्यामुळे पिंपरी पालिकेत शिवसेनेकडे जागा मागू, असे गायकवाड म्हणाले. मात्र, आघाडी झाली नाही, तर स्वबळावर लढू, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रहार पुण्यातही १५-२० जागा लढणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये पक्ष मजबूत होत असल्याने महापालिकेच्या २०२२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रहारचे नगरसेवक निवडून येणार असल्याचा दावा कडू यांनीही कालच्या शहर भेटीत व्यक्त केला. पक्ष शहराध्यक्षांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांनी पक्ष बांधणीचा आढावा घेतला. पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली व सर्वांना जोमाने संघटनाबांधणीचा आदेश दिला. या वेळी त्यांनी नगरसेवक नाही, तर जनतेचे प्रहार सेवक निवडून आणू, असे सांगितले. पिंपरी पालिकेतील भ्रष्टाचार आहे, अपंगांना न्याय वेळेवर मिळत नाही, योजना त्यांच्यापर्यंत पोचत नाही कंत्राटी कामगारांची पिळवणूक होते याकडे स्वतः लक्ष देणार असा इशारा त्यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.