Kolkata : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वच मंत्र्यांना सूचक इशारा दिला आहे. एका मंत्र्यांचा महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर ममतांनी संबंधित मंत्र्यांना थेट राजीनामा देण्यात आदेश दिले आहेत.
राज्याचे तुरुंग मंत्री अखिल गिरी यांनी एका महिला अधिकाऱ्याला धमकावल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपनेही हा मुद्दा उचलून धरला आहे. त्यामुळे ममतांनी कठोर पाऊल उचलल्याची चर्चा आहे.
गिरी यांना राजीनामा देण्यास सांगतिले असून त्यांनी राजीनामा न दिल्यास ममतांकडून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली जाऊ शकते. टीएमसीचे नेते शंतनू सेन यांनीही राजीनाम्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे गिरी हे कॅबिनेटमध्ये राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
अखिल गिरी यांनी एका महिला वन अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. संबंधित महिला अधिकारी मिदनापूर जिल्ह्यातील ताजपूर येथे एक अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या टीमचे नेतृत्व करत होती. त्यांचे नाव मनिषा शॉ असल्याचे सांगितले जात आहे.
कारवाई सुरू असतानाच तिथे मंत्री गिरी पोहचले. वन विभागाची टीम आणि गिरी यांच्यात खडाजंगी सुरू झाली. महिला अधिकाऱ्याशी बोलताना गिरी म्हणाले, तुम्ही सरकारी कर्मचारी आहात. माझ्यासमोर मान खाली घाला. एक आठवड्यात तुमचे काय हाल करतो ते पाहा. तुमचे काम सुधारा नाहीतर दांडक्याने मारेन.
गिरी यांच्या या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर टीएमसीसह सर्वच पक्षांतील नेत्यांनी टीका केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांची माफी मागण्याचे आदेश पक्षाने गिरी यांना दिले आहेत. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.