West Bengal Politics : पश्चिम बंगालच्या (West Bengal) दक्षिण परगणा जिल्ह्यात तृणमूल काँग्रेस नेत्याच्या हत्येनंतर परिस्थिती तणावपूर्ण आहे. या घटनेनंतर अनेक घरांनाही आग लावण्यात आली. या घटनेनंतर तृणमूल आणि विरोधी पक्षांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress) नेते सैफुद्दीन लस्कर यांची सोमवारी सकाळी जॉयनगर येथील त्यांच्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. लस्कर हे जॉयनगरच्या बामुंगाची भागात तृणमूल युनिटचे प्रमुख होते आणि त्यांची पत्नी पंचायत प्रमुख आहे. त्यानंतर लगेचच, लस्करच्या समर्थकांनी त्याच्या हत्येमध्ये सहभागी असल्याचा संशय असलेल्या एका व्यक्तीला पकडले आणि त्याला बेदम मारहाण केली.
सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांनी परिसरातील अनेक घरांनाही आग लावली. टीएमसीने सीपीएमला दोषी ठरवले आहे. या सगळ्यामध्ये सैफुद्दीन लस्कर यांच्या हत्येमागे सीपीएम समर्थकांचा हात असल्याचा आरोप तृणमूलच्या नेत्यांनी केला आहे.
मात्र, सीपीएम नेते सुजन चक्रवर्ती यांनी हा आरोप फेटाळून लावला असून, ही हत्या तृणमूलमधील अंतर्गत कलहाचा परिणाम असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, सीपीएमला दोष देऊन उपयोग नाही. पोलिसांनी (Police) योग्य तपास करून या कटाचा पर्दाफाश करावा, असे चक्रवर्ती म्हणाले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकाला अटक करण्यात आली आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.