Beed News : कामगारांसाठीची मध्यान्ह भोजन योजना बंद; दिवाळीत बीडमध्ये ठेचा भाकर आंदोलन

Social Activist Protest News : बांधकाम मजुरांसाठीची मध्यान्ह भोजन योजना बंद झाल्याने कामगारांची आबळ होत आहे.
Beed News
Beed NewsSarkarnama

Beed News : बांधकाम मजुरांसाठीची मध्यान्ह भोजन योजना बंद झाल्याने कामगारांची आबळ होत आहे. योजना सुरू करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी भर दिवाळीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेचा-भाकर खाऊन सरकारचा निषेध केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, प्रधान सचिव, कामगारमंत्री सुरेश खाडे (Suresh Khade), पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना निवेदन पाठविण्यात आले. महाराष्ट्र सरकारने राज्यातील बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजनासाठी 30 ऑगस्ट 2021 पासून मुंबई (mumbai) सह राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये नोंदणीकृत कामगारांना एक रुपयात मध्यान्ह भोजन योजना सुरू केली होती.

Beed News
Manoj Jarange Patil News : ओबीसी नेत्यांनी ज्ञान पाजळणे बंद करावे, मराठ्यांच्या विरोधात बोलू नये...

जेवणामध्ये चपाती, भाजी, दाळ, भात, कोशिंबीर, गुळ यांचा समावेश होता. यासाठी जळगाव, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, अहमदनगर या ठिकाणी भोजन पुरवण्यासाठी मे. इंडो अलाईड प्रोटीन फुड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत शासनाने करार केला होता. योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान करारनाम्यातील अटी व शर्तींच्या उल्लंघनामुळे संबंधित प्रकरणात कारवाई करून सुधारणा करण्याऐवजी सरकारकडून एक नोव्हेंबरपासून योजनाच बंद करण्यात आली आहे.

त्यामुळे कामगारांची परवड सुरू झाली आहे. इतर जिल्ह्यांत या योजनेत अनियमितता झाली आहे. अनियमितेप्रकरणी कारवाई करण्याऐवजी आता योजनाच बंद करण्याचा प्रताप कामगार विभागाने केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केला. त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी भर दिवाळीत ठेचा, भाकर व कांदा असे भोजन आंदोलकांनी केले. आंदोलनात अनिल घुमरे, शेख युनुस, सुदाम तांदळे, रामनाथ खोड, शेख मुबीन, धनंजय सानप, शिवशर्मा शेलार आदी सहभागी होते.

Edited by : Amol Jaybhaye

Beed News
Maratha Reservation : द्वेषातून गुन्हे; माजलगावच्या पोलिस निरीक्षकांवर मनमानीचा आरोप, जरांगेंसमोर कैफियत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com