CV Ananda Bose: राजभवनात होतेय हेरगिरी; राज्यपालांच्या आरोपाने मोठी खळबळ

West Bengal Politics : पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी केलेल्या आरोपाने मोठी खळबळ उडाली
CV Ananda Bose
CV Ananda BoseSarkarnama
Published on
Updated on

West Bengal News: पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी राजभवनात हेरगिरी करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी केलेल्या या आरोपामुळे पश्चिम बंगालमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. राज्यपाल बोस यांनी मंगळवारी सांगितले की, कोलकाता येथील गव्हर्नर हाऊसमध्ये हेरगिरी होत असल्याची माहिती आपल्याकडे आहे.

एका वृत्तवाहिनीला या संदर्भात प्रतिक्रिया देताना सीव्ही आनंद बोस म्हणाले, "हे सत्य आहे. राजभवनातील हेरगिरीबाबत माझ्याकडे विश्वसनीय माहिती आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे." मात्र, कथित हेरगिरीचे प्रयत्न कोण करत होतं, याबद्दल बोस यांनी सांगितले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

CV Ananda Bose
Chandrababu Naidu: चंद्राबाबू नायडूंना दिलासा; स्किल डेव्हलपमेंट घोटाळा प्रकरणात नियमित जामीन मंजूर

याचवेळी बोलताना त्यांनी टीएमसी कार्यकर्त्याच्या हत्येवर प्रतिक्रिया देत कायदा कायद्याचे काम करेल. आम्ही निश्चितपणे त्याच्यावर कठोर कारवाई करू. राजभवनदेखील आपले कर्तव्य बजावेल. हिंसाचारावर कठोर कारवाई व्हायला हवी. कारण बंगालच्या राजकारणावर या हिंसाचाराचा परिणाम होत आहे, असे राज्यपाल सीव्ही आनंद बोस म्हणाले.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल सीव्ही आनंद बोस आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यात कायमच कोणत्या न कोणत्या कारणावरून संघर्ष पाहायला मिळत आला आहे. यामध्ये केंद्राच्या योजनावरून तसेच विद्यापीठाच्या कुलगुरूंची नियुक्त्यांवरून बोस आणि राज्य सरकारमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले. यातच आता बोस यांनी केलेल्या आरोपांमुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

CV Ananda Bose
Bihar Reservation Amendment Bill : बिहार सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाला राज्यपालांची मंजुरी; आता 65 टक्के आरक्षण...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com