Rahul Gandhi : यात्रेत नेमकं काय घडलं, की राहुल गांधींना माघार घ्यावी लागली

Bharat Jodo Yatra : "अचानकपणे सुरक्षा कर्मचारी कुठे अन् कसे गायब झाले"; काँग्रेसचा आरोप
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi in Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) आज रद्द करण्यात आली. काँग्रेसने काश्मीर खोऱ्यात पदयात्रा करताना काँग्रेसकडून अत्यंत गंभीर सुरक्षा त्रुटी असल्याचा आरोप केला. मात्र देश पिंजून काढताना ठिकठिकाणी यात्रेत मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. मग जम्मू काश्मीरमध्येच नेमकं असं काय घडलं की त्यामुळे राहुल गांधी यांना यात्रेतून काढता पाय घ्यावा लागला?

Rahul Gandhi
Rahul Gandhi : पोलीस संरक्षणाअभावी राहुल गांधींनी काश्‍मीरमधील भारत जोडो यात्रा स्वत:पुरती थांबविली

काश्मीरमधील बनिहाल (Banihal) ते श्रीनगर (Shrinagar) हे अंतर सुमारे १२० किलोमीटरचे आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) आज बनिहालपासून श्रीनगरच्या दिशेने नियोजनाप्रमाणे २० किलोमीटर चालणार होते.

पदयात्रेस सुरूवात केली त्यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) होते. पण सुमारे एक किलोमीटर चालल्यानंतर त्यांना थांबावे लागले. तेथून पुढे राहुल गांधींना सुरक्षेच्या दृष्टीने पुढे जाणे शक्य नसल्याचे त्यांच्या सुरक्षा यंत्रणेने सांगितले.

Rahul Gandhi
Ahmednagar News : किरण काळे यांच्याकडे काँग्रेसने सोपवली मोठी जबाबदारी

बनिहाल येथे नेमकं काय घडलं?

राहुल गांधींनी श्रीनगरला जाताना बनिहाल (Banihal) बोगदा ओलांडला, त्यावेळी समोर एक मोठा अनपेक्षित जमाव (unexpected mob) त्यांची वाट पाहत असल्याचे दिसून आले. गर्दीचा बंदोबस्त करण्यासाठी असलेले पोलीस कर्मचारी कुठेही दिसत नव्हते. बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त कोलमडला होता.

तो जमाव कसा जमला, कुठून आला, याबाबत कुणालाही काही सांगता येत नव्हते. तो जमाव पाहून सुरक्षा यंत्रणेकडून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पुढे न जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार गांधी यांना जवळपास ३० मिनिटे एका जागी थांबावे लागले. अखेरीस, त्यांना सुरक्षा वाहनात नेण्यात आले आणि पक्षाने दिवसभरासाठी यात्रा रद्द करण्यात आली.

Rahul Gandhi
Solapur Politics : सुशीलकुमार शिंदेंप्रमाणे प्रणितींनाही हवाय थेट गांधी परिवाराशी ‘ॲक्सेस’

सुरक्षा कर्मचारी अचानक कुठे गेले?

दिवसभरासाठी भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) रद्द करावी लागल्याने काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. बनिहाल (Banihal) बोगदा ओलांडल्यानंतर पोलिसांनी तेथून पळ काढला. हा आदेश कोणी दिला? सुमारे १५ मिनिटे यात्रेत कोणताही सुरक्षा अधिकारी नव्हता. ही एक अतिशय गंभीर चूक असल्याचा आरोप काँग्रेसने केला.

याबाबत जबाबदार अधिकाऱ्यांनी या चुकांचे उत्तर दिले पाहिजे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि इतर यात्री सुरक्षेशिवाय चालू शकत नाहीत. जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) प्रशासनाने गर्दीचे चुकीचे व्यवस्थापन केल्याचाही आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.

Rahul Gandhi
Shivsena News; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाकडून लाडूवाटप!

यापूर्वी खराब हवामान आणि भूस्खलनामुळे बुधवारी यात्रा आधी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आज सुरक्षेच्या कारणास्तव भारत यात्रा रद्द करण्यात आली आहे. दरम्यान भारत जोडो यात्रेने उत्तर प्रदेश राज्यात प्रवेश केला त्यावेळी कोरोनाचे कारण देत केंद्राकडून यात्रा थांबविण्याची विनंती केली होती.

तसेच या यात्रेमुळे देशात कोरोना विषाणू पसरण्याची भितीही व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये वारंवार सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

Rahul Gandhi
Delhi University : मोठी बातमी! बीबीसी डॉक्युमेंटरीवरून गोंधळ: दिल्ली विद्यापीठाबाहेर जमावबंदी लागू

भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) ७ सप्टेंबर रोजी तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारी (Kanyakumari) येथून सुरू झाली आहे. भारत जोडो यात्रा तीन हजार ९७० किलोमीटर, १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा प्रवास केल्यानंतर ३० जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये संपणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com