Shivsena Shinde Group followers at Nashik
Shivsena Shinde Group followers at NashikSarkarnama

Shivsena News; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाकडून लाडूवाटप!

एकनाथ शिंदे गटाकडून धर्मवीर आनंद दिघे यांच्या 71 व्या जयंतीनिमित्त लाडू वाटप
Published on

नाशिक : शिवसेनेच्या (Shivsena) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून काल धर्मवीर (कै.) आनंद दिघे (Anand Dighe) यांची ७१ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी थेट शिवसेना नेते (Uddhav Thackrey) व माजी महापौर विनायक पांडे (Vinayak Pande) यांचा प्रभाग व शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या भद्रकाली (Nashik) परिसरात लाडू वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम सामान्य असला तरी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला. (Eknath Shinde Group take a programme in Shivsena pocket of the city)

Shivsena Shinde Group followers at Nashik
Congress News; व्यापारी पेठेत काँग्रेस कार्यकर्त्यांचे उत्साहात स्वागत

धर्मवीर स्व. आनंद दिघे यांच्या ७१ व्या जयंती निमित्त दामोदर थिएटर, भद्रकाली या जुने नाशिक भागातील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ७१ किलो लाडू वाटप करण्यात आले. या भागातील कार्यकर्ते उपमहानगरप्रमुख अक्षय कलंत्री, संघटक विनोद थोरात, विभाग प्रमुख तेजस कर्पे, उपविभाग प्रमुख नितिन लासुरे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

Shivsena Shinde Group followers at Nashik
Dada Bhuse News: शिंदे गटाची समिती शिवसेनेला आव्हान की भाजपवर दबावासाठी?

भद्रकाली हे माजी महापौर विनायक पांडे यांचे कार्यक्षेत्र व प्रभाग आहे. श्री. पांडे यांना माननारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या माध्यमातून या भागात सातत्याने विविध उफक्रम राबविले जातात. श्री. पांडे यांनी शिवसेनेचे नगरसेवक म्हणून चार वेळा या प्रभागाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांच्या माध्यमातून हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. सध्या श्री. पांडे यांचे चिरंजीव या प्रभागातून संभाव्य उमेदवार आहेत. त्यामुळे श्री. पांडे यांनी मतदारांशी संपर्क वाढविला आहे. त्यामुळे शिंदे गटाने येथे कार्यक्रम केल्याने तो चर्चेचा विषय ठरला.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे, शिवाजी भोर, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख लक्ष्मीताई ताठे, दिगंबर नाडे, शरद नामपुरकर, सुधाकर जाधव आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com