
दिल्ली विधानसभा निवडणूक मतदानापूर्वी काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 'EAGLE' पथक स्थापन केले आहे.
EAGLE'( Empowered Action Group of Leaders and Experts) च्या माध्यमातून हे पथक देशातील निवडणुकीचे निकाल, मतदार यादी यांचा अभ्यास करुन त्यांचा अहवाल पक्षाच्या हायकमांडकडे सोपवणार आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूक पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठी काँग्रेसने ही खास टीम तयार केली आहे. या टीममध्ये काँग्रेसमधील 8 बड्या नेत्यांचा समावेश आहे. अजय माकन, दिग्विजय सिंह, अभिषेक सिंघवी, प्रवीण चक्रवर्ती, पवन खेड़ा, गुरदीप सिंह सपल, नितीन राऊत, चल्ला वामशी चंद रेड्डी यांचा या ईगल टीममध्ये समावेश आहे.
'EAGLE' टीम सर्वात प्रथम महाराष्ट्र विधानसभा मतदार यादीचा विश्लेषण करणार आहे. त्याचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे सोपवणार आहे. मागील नि़वडणुकीचे निकालाचे विश्लेषण केले जाणार आहे. त्या माध्यमातून आगामी निवडणुकीची रणनीती आखणार आहेत.
महाराष्ट्रातील अनेक निवडणुकावर काँग्रेस संशय व्यक्त केला आहे. मतदार याद्यामध्ये हेराफेरी, अचानकपणे मतदानाची वाढलेली टक्केवारी, ईव्हीएममधील बिघाड आदीबाबत काँग्रेसने अनेकवेळा आक्षेप घेतले आहेत. देशातील निवडणुकी प्रक्रियेवर खासदार राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त करीत निवडणुका पारदर्शकपणे व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
महाराष्ट्र आणि हरियाणातील मतदारांच्या याद्या काँग्रेस मागितल्या आहेत. निवडणुक आयोगाने त्या देण्यास नकार दिला आहे. यावर आयोगाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.