Thackeray Group: कॉल रेकॉर्डिंगमुळे ठाकरे गटाचं अस्तित्व धोक्यात; पदाधिकाऱ्यांची बदनामी करण्याचा डाव सुरू...

Uddhav Thackeray group Call recording controvers: विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूर उत्तरच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये स्पर्धा निर्माण झाली होती. ठाकरे गटाने देखील या जागेवर दावा केला होता.
Shiv Sena Thackeray group
Shiv Sena Thackeray groupSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur, 3 Feb 2025: शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात ठाकरे गटाची अस्तित्वाची लढाई सुरू झाली. हाताच्या बोटावर मोजण्याइतपत पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गट जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

या पदाधिकाऱ्यांनी पाठोपाठ निष्ठावंत शिवसैनिक तरुण कार्यकर्त्यांनी देखील तितकाच जोर धरला आहे. शिवसेनेतील फुटून गेलेल्या शिंदे गटाच्या आमदारांना देखील अंगावर घेण्याचं धाडस शिवसैनिकांमध्ये तयार झाले आहे.

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून बेदख होत असताना केवळ हिंदुह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्मितेसाठी झठणाऱ्या शिवसैनिकांचा संघर्ष सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत जागा सोडली असली तरी महाविकास आघाडी म्हणून लढवताना ठाकरे गटाचे अस्तित्व जाणवले. विधानसभा निवडणुकीत मात्र या अस्तित्वाला धक्का मिळाला.

Shiv Sena Thackeray group
Santosh Deshmukh: संतोष देशमुख हत्येचे धक्कादायक पुरावे; दमानिया उद्या बॉम्ब फोडणार? मुंडेंचा राजीनामा...

नेतृत्व शिल्लक नसताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे आव्हान ठाकरे गटापुढे आहे. अशाने सातत्याने होणाऱ्या पक्षांतर्गत कॉल रेकॉर्डिंगमुळे गटाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

पक्षातीलच पदाधिकारी पक्षांतर्गत अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आणत आहेत. विधानसभा निवडणूक आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या कॉल रेकॉर्डिंग मुळे पक्षातीलच पदाधिकाऱ्यांची बदनामी करण्याचा डाव सुरू आहे. त्यामुळे पायात पाय घालण्याची वृत्ती ठाकरे गटात फोफावली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूर उत्तरच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये स्पर्धा निर्माण झाली होती. ठाकरे गटाने देखील या जागेवर दावा केला होता. या मागणीला जोर लावण्यासाठी ठाकरे गटाने मेळावा आयोजित केला होता.

Shiv Sena Thackeray group
Union Budget 2025 : 'खडूस’ बाईनं सादर केलेला बजेट; सुरीला मध लावून ती मध्यमवर्गीयांच्या मानेवर फिरवली!

या मेळाव्याच्या पत्रिकेत नावाचा उल्लेख नसल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी निर्माण झाली होती. त्यासंदर्भातील कॉल रेकॉर्ड देखील व्हायरल करण्यात आले होते. त्यामुळे पक्षांतर्गतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली होती. तर दोन दिवसांपूर्वी युवा पदाधिकारी देखील कॉल रेकॉर्डिंग मुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडला होता.

एका नृत्यांगना सोबतचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्यात आले होते. त्यामुळे मनस्ताप झालेल्या या युवा नेत्यांनी समाज माध्यमांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. खासगीत हा पदाधिकारी पक्षातीलच असल्याचं सांगितले जात होते.

त्यामुळे पदाधिकाऱ्यांकडूनच दुसऱ्या पदाधिकाऱ्याचे पाय ओढण्याचे काम ठाकरे गटात सुरू असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला प्रतिस्पर्धी तयार होऊ नये, याची काळजी देखील पदाधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे. त्यामुळे पक्षातीलच वाढते नेतृत्व संपवण्याचा डाव काही ठाकरे गटातील पदाधिकारीच करत असताना दिसत आहेत. त्यामुळे अस्तित्वहीन झालेला ठाकरे गट अशा कृत्यांमुळे वाढणार कसा असावाल निष्ठावंत शिवसैनिक करताना दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com