Rahul Gandhi Defamation Case: 'मोदी' बाबतची याचिका फेटाळल्यानंतर राहुल गांधी काय करणार?

Rahul Gandhi Plea Dismissed: सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावली आहे
Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi Defamation news Update:  काँग्रेसचे नेते, माजी खासदार राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. "सर्व चोरांचे आडनाव मोदी का?" या विधानासाठी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दोषी ठरवण्यात आले आहे. ही शिक्षा रद्द करण्यात यावी, अशी याचिका राहुल गांधी यांनी सुरत सत्र न्यायालयात दाखल केली होती. पण न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. या प्रकरणी आता राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात (High Court) आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.

पण या निर्णयामुळे राहुल गांधी यांना दिल्लीतील त्यांचे सरकारी निवासस्थानही उद्यापर्यंत रिकामे करावे लागणार आहे. लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर त्यांनी सरकारी निवासस्थानातील आपले साहित्य आपल्या आईच्या म्हणजेच सोनिया गांधींच्या बंगल्यावर हलवले होते.पण निवासस्थान पूर्णपणे रिकामे करण्याआधी ते न्यायालयाच्या निर्णयाची प्रतिक्षा करत होते. (Rahul Gandhi Latest news)

Rahul Gandhi
Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींना दिलासा नाहीच ; 'मोदी' बाबतची याचिका फेटाळली ; आता सुप्रीम कोर्टात..

27 मार्च रोजी राहुल गांधींना बंगला रिकामा करण्याची नोटीस मिळाली होती. लोकसभा हाऊसिंग पॅनलने राहुल गांधी यांना रविवारपर्यंत घर सोडण्याची मुदत दिली आहे. राहुल गांधींना हा बंगला 2005 मध्ये मिळाला होता. गेल्या १९ वर्षांपासून ते या बंगल्यात राहत होते. राहुल गांधी आता त्यांची आई सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या १० जनपथ येथील बंगल्यात राहणार आहेत.

या प्रकरणी राहुल गांधींच्या वकिलांनी सुरतच्या सत्र न्यायालयात ३ एप्रिल रोजी दोन अपील दाखल केले होते. पहिले शिक्षेच्या स्थगितीसाठी आणि दुसरे अपील निकाली निघेपर्यंत दोषसिद्धीसाठी स्थगितीसाठी होता. राहुल गांधींच्या अटकेच्या निर्णयाला ३ मे पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. त्यांना कोर्टातून अंतरिम जामीन मिळाला आहे. शिक्षेला स्थगिती देण्याच्या याचिकेवर निर्णय होईपर्यंत त्यांना दिलेला जामीन कायम राहणार आहे. पण आता राहुल गांधींना सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत.

Edited By-Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com