Eknath Shinde On Nanded Tragedy : 'मृत्यूचं थैमान सुरू असताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत कुठे आहेत?' मुख्यमंत्री शिंदे म्हणाले...

Eknath Shinde On Nanded Tragedy : "विरोधक या मृतांचं राजकारण करत आहेत. हे दुर्दैवी आहे.."
Eknath Shinde On Nanded : Tanaji Sawant
Eknath Shinde On Nanded : Tanaji Sawant Sarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde On Nanded Tragedy : नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी तब्बल 24 रुग्ण दगावल्याची घटना समोर आली होती. धक्कादायक म्हणजे या मृतांमध्ये 12 बालकांचा समावेश होता. यामध्ये एका बालकासह आईचाही मृत्यू झाला होता. यामुळे राज्य सरकार, आरोग्य मंत्रालयावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल करत सरकारला धारेवर धरले आहे.

Eknath Shinde On Nanded : Tanaji Sawant
Tanaji Sawant Vs Ranajagjitsinha Patil : तानाजी सावंत यांची राणाजगजीतसिंह पाटलांवर कुरघोडी; कट्टर विरोधकाला संपर्क

राजधानी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत एका महत्त्वपूर्ण बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. बैठक पार पडल्यानतंर माध्यम प्रतिनिधींनी राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांना विचारण्यात आले की, नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचं थैमान घडून येत असताना राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत कुठे आहेत?

Eknath Shinde On Nanded : Tanaji Sawant
Nanded Political News : बाजार समितीसाठी भाजप-काँग्रेस युती म्हणजे नवी समीकरणे, की आणखी काही ?

या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत बैठका घेत आहेत. नांदेडच्या हॉस्पिटलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ स्वत: जाऊन आले आहेत. मी स्वत: त्या अधिकाऱ्यांशी बोलतोय, आम्ही सर्व यामध्ये लक्ष घालत आहोत, पण विरोधक या मृतांचं राजकारण करत आहेत, हे दुर्दैवी आहे,"

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com