Tanaji Sawant Vs Ranajagjitsinha Patil : तानाजी सावंत यांची राणाजगजीतसिंह पाटलांवर कुरघोडी; कट्टर विरोधकाला संपर्क

Om Rajenimbalkar And BJP : धाराशिव महायुतीत ठिणगी पडल्याने जिल्ह्याचे राजकारण तापणार
Tanaji Sawant, Ranajagjitsingha Patil, Om Rajenimbalkar
Tanaji Sawant, Ranajagjitsingha Patil, Om RajenimbalkarSarkarnama

Dharashiv Political News : निवडणुका जवळ येत असल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील चित्र पुन्हा बदलत असल्याची चर्चा आहे. शिवसेनेतील फुटीनंतर पालकमंत्री तानाजी सावंत, ज्ञानराज चौगुले हे दोघे शिंदे गटासोबत गेले, तर खासदार ओमराजे निंबाळकर व कैलास पाटील उद्धव ठाकरे गटासोबत राहिले. त्यामुळे या दोन्ही गटांत आडवा विस्तवही जात नव्हता. मात्र, धाराशिव येथे मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या कार्यक्रमात हुतात्मा स्तंभाला पुष्पहार अर्पण करून निघताना पालकमंत्री तानाजी सावंत यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे कैलास आला नाही का ? अशी विचारणा करीत भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटलांवर कुरघोडी केली आहे. (Latest Political News)

Tanaji Sawant, Ranajagjitsingha Patil, Om Rajenimbalkar
PM Modi In Old Parliament: जुन्या संसदेतील शेवटचे अधिवेशन; पंतप्रधान मोदींनी सांगितल्या कडू-गोड आठवणी

मंत्री सावंत हे भाषणातून कैलास पाटील व ओमराजे निंबाळकर (OmRaje Nimbalkar) यांच्यावर अनेक खालच्या स्तरावर आरोप करीत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तानाजी सावंत व भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यात सुप्त संघर्ष सुरू आहे. या दोघांमध्ये अनेक दिवसांपासून या ना त्या कारणाने धुसफूस सुरू आहे, तर निधी वाटपावरून राणा पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार न करता नियोजन विभागाच्या सचिवाकडे केली. यातून त्यांनी सावंतांना कागदोपत्री कोंडीत पकडले. त्यानंतर दोघात ठिणगी पडून पुढे दरी वाढतच गेली.

Tanaji Sawant, Ranajagjitsingha Patil, Om Rajenimbalkar
Amravati Politics News : अमरावती जिल्ह्यातील ‘त्या’ दोन आमदारांमध्ये पुन्हा कडवटपणा !

मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीत येथील मेडिकल कॉलेजसाठी जागा निवडण्यावरून दोघांत वाद पाहावयास मिळाला. दोघांनी वेगवेगळ्या जागेची निवड केली होती. मात्र, मंत्रिमंडळाने राणा पाटील यांनी सुचवलेली व सलग नसलेल्या जागेला मंजुरी दिल्याने सावंत यांची त्यांच्यावर नाराजी आहे. कार्यक्रमावेळी सावंत व राणा पाटील एकमेकांना फारसे बोलले नाहीत. त्यामुळे पाटील यांच्यावर कुरघोडी करण्याच्या दृष्टीने राणा पाटील यांचे कट्टर विरोधक ओम राजेनिंबाळकर यांच्याशी संवाद साधला.

मंत्री तानाजी सावंतांनी (Tanaji Sawant) खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे 'कैलास नाही का आला ?' अशी विचारणा केली. यानंतर 'येत आहेत,' असे उत्तर ओमराजे यांनी दिले. त्यामुळे दोघांत काही दिवसांपासून असलेला अबोला संपल्याची चर्चा सुरू झाली आहे. सत्ता परिवर्तनावेळी सावंत यांच्यासोबत खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील हे आले नाहीत, याचा राग सावंतांना आहे.

आता भाजप आमदार राणा पाटील (Ranajagjitsingha Patil) मंत्री सावंत यांच्यावर भारी ठरत आहेत. ते सावंतांना राजकीय व प्रशासकीय शह देताना दिसत आहेत. यामुळे सावंत खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांचा टेकू घेतात, अशीही चर्चा कार्यकर्त्यांत आहे. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रमात मंत्री सावंत यांनी खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांच्या खांद्यावर हात टाकत बळ दिले होते.

(Edited by Sunil Dhumal)

Tanaji Sawant, Ranajagjitsingha Patil, Om Rajenimbalkar
BJP Political News : पिंपरी-चिंचवड भाजप टीममधून अमोल थोरातांचा पत्ता कट, तर आमदार लांडगे समर्थकांनाही वगळलं; कारण काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com