नवी दिल्ली : पाकिस्तानात सध्या राजकीय हालचालींनावेग आला आहे. पंतप्रधान इमरान खान (Imran khan) यांच्या विरोधात मित्रपक्षांसह इतर विरोधी पक्ष एकवटले असून त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे इमरान खान यांची सत्ता धोक्यात आली आहे. असे असतानाच विरोधकांनी दाखवलेली एकजूट निश्चितच कौतुकास्पद आहे. शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) लवकरच पाकिस्तानचे पंतप्रधान होणार आहेत.अशी घोषणा पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते बिलावल भुट्टो (Bilawal Bhutto) यांनी केली आहे.
बुधवारी संध्याकाळी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी इस्लामाबादमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेत बिलावल भुट्टो यांनी ही घोषणा केली आहे. पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी संध्याकाळी विरोधकांनी इस्लामाबादमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत शाहबाज शरीफ आणि बिलावल भुट्टोही उपस्थित होते. तर 'मी विरोधी पक्षातील माझ्या सहकाऱ्यांचे आभार मानतो की त्यांनी जनतेचा आवाज ऐकून हा निर्णय घेतला. आम्ही एक नवीन प्रवास सुरू केल्याचे शहबाज शरीफ यांनी म्हटले.
- कोण आहेत शाहबाज शरीफ
2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत शाहबाज यांना पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज (PML-N) ने पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केले होते. मात्र, त्यानंतर इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफने (पीटीआय) निवडणुकीत बाजी मारली. शाहबाज शरीफ यांचे पूर्ण नाव मियां मुहम्मद शाहबाज शरीफ आहे. त्यांचा जन्म 23 सप्टेंबर 1951 ला लाहोरमध्ये झाला. मोठा भाऊ नवाझ शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान राहिले आहेत. नवाझ शरीफ यांच्या काळात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात गेले होते. सध्या शाहबाज हे पाकिस्तानच्या संसदेत विरोधी पक्षनेते आहेत. ते पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत.
- भारत पाकिस्तान फाळणीपुर्वी वडीलांचा भारतात व्यवसाय
शाहबाज यांचे वडील मियां मुहम्मद शरीफ हे व्यापारी होते. ते काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील रहिवासी होते, तर त्यांची आई पुलवामा येथील रहिवासी होती. भारत-पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी शाहबाज यांचे वडील पाकिस्तानात गेले.
नवाझ शरीफ यांच्याशिवाय शाहबाज यांचा आणखी एक मोठा भाऊ अब्बास शरीफ आहे. शाहबाजने 1973 मध्ये चुलत बहीण नुसरत शाहबाजशी लग्न केले. त्यांना सलमान, हमजा, जवेरिया आणि राबिया अशी चार मुले होती. 2003 मध्ये शाहबाजने तेहमीना दुर्राणीसोबत दुसरे लग्न केले.
- राजकीय कारकीर्द
शाहबाज शरीफ यांनी लाहोरमधील सरकारी महाविद्यालयात शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी व्यावसायिक म्हणून करिअरला सुरुवात केली. 1985 मध्ये ते लाहोर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष बनले. येथून त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
1987 मध्ये त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. 1988 मध्ये पहिली निवडणूक लढवली आणि जिंकली. 1997 मध्ये ते पहिल्यांदाच पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर 2008 आणि 2013 मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. 2018 मध्ये, पाकिस्तान मुस्लिम लीगची कमान हाती घेतली आणि अध्यक्ष बनले. 2018 च्या निवडणुकीत पराभवानंतर त्यांची संसदेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली.
- तुरुंगवासाची शिक्षा
शाहबाज 2020 मध्ये मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा झाली. 2021 मध्ये त्यांना जामीन मिळाला. तेव्हा राजकीय द्वेषामुळे आपल्याला गोवण्यात येत असल्याचा आरोप शाहबाज यांनी केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.