Bhagwant Mann: दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या घरावर छापा; काय आहे कारण

Election Commission News : कपूथला येथील भगवंत मान यांच्या घरी निवडणूक आयोगाचे पथक दाखल झाले आहे. त्यांनी काही महत्वाच्या कागदपत्रांची तपासणी केली.
Arvind Kejriwal & Bhagwant Mann
Arvind Kejriwal & Bhagwant MannSarkarnama
Published on
Updated on

Bhagwant Mann House Raid: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दिल्ली येथील सरकारी निवासस्थानावर निवडणूक आयोगाने छापा टाकला आहे.

कपूथला येथील भगवंत मान यांच्या घरी निवडणूक आयोगाचे पथक दाखल झाले आहे. त्यांनी काही महत्वाच्या कागदपत्रांची तपासणी केली. दिल्ली विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. मुख्यमंत्री भगवंत मान हे आम आदमी पार्टीचे स्टार प्रचारक आहेत.

Arvind Kejriwal & Bhagwant Mann
Suresh Dhas: सुरेश धसांनी अजितदादांना दिलेल्या पेन ड्राईव्ह मध्ये दडलंय काय? 500 जण कोमात...

दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या घरी निवडणूक आयोगान छापा टाकल्याने दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं आहे. आपच्या नेत्यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Arvind Kejriwal & Bhagwant Mann
Bhai Uddhavradada Patil: हेच खरे भाई अन् दादाही! ज्यांनी CM पदावर सोडले पाणी, मात्र पक्ष सोडला नाही!

निवडणूक कालावधीत आलेल्या तक्रारी सोडवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र पथकाची नेमणूक केली जाते. हे पथक तक्रारीची दखल घेत कारवाई करते. या पथकात निवडणूक आयोगाचे अनेक वरिष्ठ अधिकारी असतात.भगवंत मान यांच्या घरी छापा टाकण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com