'कोव्हॅक्सिन'ला WHO चा दणका; आंतरराष्ट्रीय पुरवठ्यावर घातली बंदी, हे आहे कारण...

लशीच्या आंतरराष्ट्रीय पुरवठ्यावरच संघटनेने बंदी घालण्यात आल्याचे जाहीर केल्याने भारताला धक्का बसला आहे.
Covaxin
Covaxin Sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : विदेशी लशींना टक्कर देत कोरोना (Covid 19) विषाणुवर प्रभावी ठरलेली आणि सुरक्षितता सिध्द केलेल्या स्वदेशी कोव्हॅक्सिन (Covaxin) लशीला जागतिक आरोग्य संघटनेने शनिवारी दणका दिला आहे. या लशीच्या आंतरराष्ट्रीय पुरवठ्यावरच संघटनेने बंदी घालण्यात आल्याचे जाहीर केल्याने भारताला धक्का बसला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UN) माध्यमातून होणारा लशीचा पुरवठा थांबवण्यात आला आहे.

भारतातील भारत बायोटेक (Bharat Biotech) या कंपनीकडून लशीचे उत्पादन घेतले जाते. राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या (NIV) मदतीने कंपनीने ही लस विकसित केली आहे. भारतातील पहिली स्वदेशी लस म्हणून या लशीनं आपली गुणवत्ता जागतिक स्तरावरही सिध्द केली आहे. पण त्याला आता मोठा धक्का बसला आहे. आरोग्य संघटनेच्या (WHO) पाहणीमध्ये काही त्रुटी आढळून आल्याने बंदी घातल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे कंपनीने या घोषणेच्या एक दिवस आधीच लशीचे उत्पादन कमी करत असल्याचे जाहीर केलं होतं.

Covaxin
भाजप अन् आपकडून ऑफर; मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग करणाऱ्या काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट

ही लस सुरक्षित असून त्याबाबत कोणतीही अडचण नाही, असं WHO नं स्पष्ट केलं आहे. मात्र, उत्पादनाच्या पध्दतीवर WHO नं बोट ठेवलं आहे. गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रक्टिसेस (GMP) मध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत. दि. 14 ते 22 मार्च 2022 दरम्यान इमर्जन्सी युझ लिस्टिंग (EUL) अंतर्गत केलेल्या पाहणीत या त्रुटी आढळल्या आहेत. कंपनीकडून उत्पादन सुविधा अद्ययावत करणे आणि निरीक्षणात आढळून आलेल्या त्रुटी बंदीच्या काळात दूर कराव्यात, असं संघटनेने म्हटले आहे.

कारवाईची शिफारस

WHO ने कोव्हॅक्सिन लस मिळालेल्या देशांनी योग्य कारवाई करण्याची शिफारसही केली आहे. पण ही कारवाई नेमकी कोणत्या स्वरूपाची असले याबाबत स्पष्ट करण्यात आलेलं नाही. त्यामुळे कोव्हॅक्सिनचा संयुक्त राष्ट्रसंघामार्फत होणार पुरवठा थांबणार आहे. लशीला जागतिक स्तरावर आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यासही संघटनेने विलंब लावला होता.

Covaxin
विरोधक सर्वोच्च न्यायालयात जाण्याआधीच राष्ट्रपतींची पंतप्रधानांच्या शिफारशीवर मोहोर

लस ओमिक्रानवर 90 टक्के प्रभावी

भारत बायोटेक या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कोव्हॅक्सिन लशीचा बूस्टर डोस घेतल्यानंतर तयार होणाऱ्या अँटीबॉडी ओमिक्रॉनसह डेल्टा विषाणूचा संसर्ग वाढण्यापासून प्रभावीपणे रोखत असल्याचे सिध्द झाले आहे. डेल्टा व्हेरिएंटचा प्रभाव 100 टक्के तर ओमिक्रॉनचा 90 टक्के प्रभाव कमी होत आहे, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कोव्हॅक्सिन ही पहिली स्वदेशी लस आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com