Jayprakash Raval News; मतदारसंघासाठी चारशे कोटींचा निधी आणला!

शिंदखेडा मतदारसंघाला विकासासाठी आलेल्या निधीचा लाभ झाल्याचा रावल यांचा दावा
Jaykumar Rawal
Jaykumar RawalSarkarnama

धुळे : (Dhule) राज्यात (Maharashtra) अडीच वर्षांपूर्वी भाजप- (BJP) शिवसेना (Shivsena) युतीला स्पष्ट बहुमत मिळाले असतानाही उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांनी गद्दारी केल्याने अडीच वर्ष आपल्याला सत्तेच्या बाहेर राहावे लागले. मात्र राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सरकार सत्तेवर येताच मतदारसंघासाठी चारशे कोटींचा निधी मिळाला आहे, असा दावा भाजप नेते, आमदार जयकुमार रावल (Jaykumar Raval) यांनी केला. (Jaykumar Raval claims 400 Cr. Funds is allocate for Devolopment of his Dondaicha constituency)

Jaykumar Rawal
Nashik Politics : सत्यजीत तांबेंना धक्का; ठाकरे गटाचा उमेदवार ठरला

अभद्र युती शिवसेनेच्या निष्ठावंत आमदारांना सहन झाली नाही. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडून सहा महिन्यांपूर्वी भाजपबरोबर सरकार स्थापन केले. यानंतर शिंदखेडा मतदारसंघात चारशे कोटींचा निधी आणण्यात यश‍ आले, असे माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी सांगितले.

Jaykumar Rawal
Devendra Fadnavis : पुण्यासाठी 2 हजार कोटींचा निधी : फडणवीसांची घोषणा!

दोंडाईचा येथील रावल गढीवर आमदार कार्यालयात शिंदखेडा मतदारसंघातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाचा शनिवारी सत्कार झाला. अमळथे, आरावे, कळगाव, कुरूकवाडे, गोराणे, जोगशेलू, दराणे, निमगूळ, पाष्टे, रोहाणे, रामी, सतारे, वणी, वरसुस यासह साक्री तालुक्यातील बळसाणे, नागपूर आदी गावातील सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा नागरी सत्कार झाला.

विकासासाठी प्रयत्न

आमदार रावल म्हणाले, मतदारसंघातील अनेक गावांत आपल्याच कार्यकर्त्यांमध्ये लढत होते. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा, असे आवाहन असते. अशा गावांना अनेक वर्षांपासून निधी देत असतो. परंतु, काही गावांमध्ये एकमत होत नसल्याने तिथे निवडणुका होतात. तेथे विरोधक निवडणूक लावण्याचा प्रयत्न करतात. त्याकडे दुर्लक्ष करून अधिकाधिक गावविकास कसा होईल याकडे लक्ष द्यावे. सरकारकडून आवश्यक निधी मिळवून आणला जाईल. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आता भाजपची सत्ता असल्याने सर्व गावांच्या विकासासाठी प्रयत्नशील असेल.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, सरचिटणीस कामराज निकम, भारत ईशी, पंचायत समिती उपसभापती रणजित गिरासे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र देसले, जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्र गिरासे, पंकज कदम, डी. आर. पाटील, दादासाहेब रावल दूध संघाचे अध्यक्ष रघुवीर बागल, उपाध्यक्ष महेंद्र निकम, पंचायत समिती सदस्य प्रवीण मोरे, दुल्लभ सोनवणे, प्रकाश बोरसे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रा. रमेश खैरनार, शहराध्यक्ष प्रवीण महाजन, रवी उपाध्ये, नारायण गिरासे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com