कॅप्टन अमरिंदर सिंग आपला पक्ष भाजपत विलिन करणार? : अमित शहांबरोबर दिल्लीत बैठक

या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हेही उपस्थित राहणार असून आगामी निवडणुकीसंदर्भात जागावाटपावरही प्राथमिक बोलणी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Amarinder Singh-Amit Shah
Amarinder Singh-Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंजाबचे (panjab) माजी मुख्यमंत्री, कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) हे आपला पंजाब लोक काँग्रेस हा पक्ष भारतीय जनता पक्षात (BJP) विलिन करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सिंग हे आज (ता. १० सप्टेंबर) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. या भेटीत पंजाब लोक काँग्रेस भाजपत विलिन करण्याबाबत चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. (Will Captain Amarinder Singh merge his party with BJP?)

नवज्योतसिंग सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यात विधानसभा निवडणुकीच्या अगोदर जोरदार वाद झाला होता. त्यावेळी सिद्धू यांच्या पाठीशी काँग्रेस हायकमांड होते. तसेच, सिद्धू यांची पंजाब प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करू नये, अशी मागणी सिंग यांच्याकडून करण्यात आली होती. मात्र, सिंग यांच्या विरोधानंतरही काँग्रेस हायकमांडने सिद्ध यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवले होते. त्यामुळे नेतृत्वावर आगपाखड करत सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाची राजीनामा आणि त्यानंतर काँग्रेस पक्षाचे सदस्यत्वही सोडले होते.

Amarinder Singh-Amit Shah
सोलापूर विद्यापीठात शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीची लिट्‌मस टेस्ट; युवा सेनेबरोबर एकत्र लढणार

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर पंजाब लोक काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांनी भाजपशी युती करत विधानसभेची निवडणूक लढवली होती. पण या युतीच्या पदरी विशेष काही पडले नव्हते. तेव्हापासून सिंग हे काहीसे अडगळीत पडले होते. आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये बहुमत मिळवत सत्ता प्रस्थापित केली होती.

Amarinder Singh-Amit Shah
Sunil Raut : दिल्लीत राजकीय भेटीसाठी आलो नाही ; राऊतांचा दावा

दरम्यान, कॅप्टन आज केंद्रीय गृहमंत्री शहा यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. या भेटीत पंजाब लोक काँग्रेस पक्ष हा भारतीय जनता पक्षात विलिन करण्याबाबत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हेही उपस्थित राहणार असून आगामी निवडणुकीसंदर्भात जागावाटपावरही प्राथमिक बोलणी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com