Sunil Raut : दिल्लीत राजकीय भेटीसाठी आलो नाही ; राऊतांचा दावा

Sunil Raut : मी कुठल्याही वकिलांशी मी चर्चा केलेली नाही.
Sunil Raut, sanjay raut
Sunil Raut, sanjay rautsarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे भाऊ आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांनी काल (शुक्रवारी) मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. त्यानंतर ते दिल्लीला आले आहेत.

संजय राऊत यांना बाहेर काढण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राऊत कुटुंबीयांकडून भाजपसोबत सेटलमेंट केली जात असल्याची चर्चा रंगली आहे. भाजप समोर शिवसेना गुडघे टेकेल का ? हा प्रश्न पुढे आला आहे.

सुनील राऊत यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे, ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. राऊत म्हणाले, "खासदार संजय राऊत यांचे दिल्लीमध्ये घर आहे. त्या घराची परिस्थिती पाहण्यासाठी मी दिल्लीत आलो आहे. मी कुणाचीही राजकीय भेट घेतलेली नाही, मी कुठल्याही वकिलांशी मी चर्चा केलेली नाही,"

Sunil Raut, sanjay raut
Ganesh Visarjan 2022 : 'म्याव म्याव' च्या घोषणाबाजीनं राजकारण तापलं ; ठाकरे-शिंदे गट आमने-सामने

"संजय राऊत यांच्या जामीनाबाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार नाही. देशातला कुठलाही नामवंत वकील सांगेल की संजय राऊत यांच्यावरच्या आरोप मध्ये काही तथ्य नाही," असे सुनील राऊत म्हणाले.

काल (शुक्रवारी) ते उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते. त्याबाबत राऊत म्हणाले, "उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख असले तरी ते आता माझ्या राऊत कुटुंबाचे देखील प्रमुख आहेत.त्यांनी मला बोलावले होते. उद्धव ठाकरे यांनी कुटुंबाची विचारपूस केली,"

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे कंबरडे मोडण्यासाठी शिवसेनेचा खासदार संजय राऊत यांना अटक केली आहे. त्यानंतरही राऊत हे आक्रमकच राहिले.

ईडीच्या ताब्यानंतर त्यांचा मुक्काम सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयीन कोठडीत असल्याने राऊत हे जामिनावर बाहेर येऊ शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. अशातच ठाकरे हे राउतांना भेटण्यासाठी ऑर्थर रोड तुरुंगात जाणार असल्याची चर्चाही पसरली होती. ऐन गणेशोत्सव धमधुमीतच ठाकरे आणि राऊत यांच्या संभाव्य भेटीचा वेगवेगळ्या बाजुन् अर्थ काढला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com