
Delhi Exit Poll: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडलं. दिल्लीतील 70 विधानसभा जागांसाठी मतदान झालं आहे. मतदानाची प्रक्रिया एकदा पार पडल्यानंतर सर्वांना उत्सुकता असते ती एक्झिट पोलचे अंदाज काय सांगतात याची. दिल्ली निवडणुकीचा अंतिम निकाल 8 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे.
दिल्लीत 70 जागांसाठी एकूण 699 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. अंतिम आकडेवारी समोर आली नसली तरी आता एक्झिट पोलचे कौल समोर आले आहेत. वेगवेगळ्या एक्झिट पोलमध्ये भाजपने (BJP) जोरदार मुसंडी मारताना अरविंद केजरीवालांच्या आपला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
2024 मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आणि नंतर झालेल्या हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी विविध वृत्तवाहिन्या आणि कंपन्यांचे अंदाज मात्र साफ चुकले होते. 2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होण्याचे भाकित करण्यात आले होते, फक्त जागांचा फरक होता. यावेळेस मात्र, एक्झिट पोलमध्ये सर्वाधिक जागा दाखवण्यात आला आहे, पण भाजपला टेन्शन आहे की एक्झिट पोलने (Exit Poll) सांगितलेला अंदाज खरा ठरतो का?.
गेल्या तीन- चार महिन्यापासूनच दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे वेध लागले होते. दिल्लीतील सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकींसाठी कंबर कसून प्रचार केला. एकीकडे भाजप आपला 27 वर्षाचा वनवास संपवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर काँग्रेसने दिल्ली पुन्हा काबीज करण्यासाठी रणनीती आखली आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाने चौथ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. सत्ताधाऱ्यांनी सत्ता राखण्यासाठी तर विरोधकांनी सत्ता स्थापनेसाठी जोरदार तयारी सुरू केली होती. काल मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर राजकीय पटलावर वावरणाऱ्या आपल्या नेतेमंडळींचं भवितव्य इव्हीएम मशीनमध्ये बंदिस्त झालं आहे.
आप, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत दिल्ली विधानसभा निवडणुकीत होत असताना. मतदानाच्यानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये आपसाठी तिसऱ्यांदा सत्तेची वाट खडतर असल्याचे दिसून येत आहे. तर भाजप दहा वर्षांनंतर जोरदार कमबॅक करण्याची शक्यता विविध पोलमधून समोर आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.