Manipur Politics : 'राजीनामा देणार नाही, या कठीण काळात..' ; मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी सर्व शक्यतांना फेटाळले..

Manipur Cm Biren Singh : सकाळपासून व्यक्त केली जात होती. मात्र आता ते राजीनामा देणार नसल्याचे आता त्यांनी ट्वीट करत सांगितले आहे.
Manipur Cm Biren Singh :
Manipur Cm Biren Singh : Sarkarnama
Published on
Updated on

Manipur News : मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह (N Biren Singh) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दर्शवला आहे. राज्यपाल अनुसुईया उईके यांची भेट घेतल्यानंतर सिंह राजीनामा देतील अशी शक्यता आज सकाळपासून व्यक्त केली जात होती. मात्र आता ते राजीनामा देणार नसल्याचे आता त्यांनी ट्वीट करत सांगितले आहे. (N, Biren Singh News)

Manipur Cm Biren Singh :
Politicians AI Photo's: महाराष्ट्राच्या राजकारणातील दिवंगत लोकनेत्यांचे AI फोटो !

मागील दोन महिन्यांपासून मणिपूर राज्यात सुरू असलेल्या हिंसाचाराला आळा घालण्यात अपयशी ठरल्याबद्दल, मुख्यमंत्री बीरेन यांच्यावर सर्वच स्तरातून टिका करण्यात येत होती. 3 मे रोजी राज्यात हिंसाचार उसळला होता, त्यानंतर आजपर्यंत मणिपूरमध्ये शांततेची चिन्हे दिसत नाही. या हिंसाचारामध्ये 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मैतेई समुदायातून येणारे एन. बिरेन सिंग यांच्यावरही पक्षपातीपणा केल्याचा त्यांच्या राजकीय विरोधकांनी आरोप केला आहे.

मणिपूरमधील भाजपच्या अनेक कुकी समुदायातून येणाऱ्या आमदारांनी त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. याशिवाय मणिपूरमधील कुकी बहुल आदिवासी भागांना स्वायत्तता देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. मात्र बिरेन सिंह यांनी ट्विट करून राजीनामा न देण्याबाबत ठाम असल्याचे म्हंटले आहे.

Manipur Cm Biren Singh :
Maharashtra Sadan : सावरकरांच्या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले-अहिल्याबाईंचे पुतळे हटवले, रोहित पवारांचे ट्वीट व्हायरल..

बिरेन सिंह म्हणाले, 'मला हे स्पष्ट करायचे आहे की, या कठीण काळात मी माझ्या पदाचा राजीनामा देणार नाही,' बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याच्या शक्यतेची बातमी पसरताच त्यांच्या समर्थकांची मोठ्या संख्येने घराबाहेर गर्दी केला होती. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊ नये, अशी मागणी बिरेन सिंग यांचे समर्थक करत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com