Savarkar Jayanti Controversy in Maharashtra Sadan : दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. पण ही जयंती साजरी करताना महाराष्ट्र सदनातच्या मध्यभागी असेलले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे मूळ जागेवरून दुसरीकडे हलवण्यात आले होते, कार्यक्रम झाल्यावर दोन्ही पुतळे पुन्हा जागेवर आणून ठेवण्यात आले. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
दरम्यान आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. दोन्ही विश्वव्यापी कर्तुत्ववान व्यक्तिमत्वांचे पुतळे हटवून, महाराष्ट्राच्या सरकारला शोभणारे नाही, अशी टीका रोहित पवार यांनी केली. याबाबत रोहित यांनी फेसबुक पोस्ट केले आहे. यामध्ये त्यांनी सावरकर जयंती कार्यक्रमाच्या आयोजन आधीचा आणि नंतरचा असे दोन्ही फोटो टाकून सरकारवार निशाणा साधला आहे.
रोहित पवार (Rohit Pawar) आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, "महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी, न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही. हे करत असताना सर्वसामान्यांचा अभिमान असणारी महाराष्ट्र शासनाची मुद्रा झाकली जात आहे. याचे भान देखील सरकारला राहिले नाही. नेहमी गोंधळ घालणारे बोलघेवडे #chocklate_boy आता गप्प का? या घटनेचा निषेध करण्याची हिम्मत दाखवतील का?" असे रोहित म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.