Schemes Names Change: 'मनरेगा'चं नाव बदललं! मोदी सरकारनं काँग्रेस सरकारच्या काळातील 33 योजनांची नाव आधीच बदललीत; वाचा यादी

Schemes Names Change: काँग्रेस प्रणित युपीए सरकारच्या काळात आलेल्या अनेक योजनांची नाव बदलून त्याच योजना मोदी सरकारच्या गेल्या १२ वर्षांच्या काळात सध्या सुरु आहेत.
Modi Politics
Modi Politics
Published on
Updated on

Schemes Names Change: केंद्रातील भाजप प्रणित एनडीए सरकारनं काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचं नाव बदललं आहे. नव्या नावातून त्यांनी महात्मा गांधींचं नावच गायब केलं आहे. त्याऐवजी पूज्य बापू असं नाव वापरलं आहे. यावरुन आता सोशल मीडियातून सरकारवर टीकेचा भडिमार सुरु झाला आहे. पण यापूर्वीच सरकारनं काँग्रेसच्या काळातील अनेक योजनांच्या नावांमध्ये बदल केला आहे.

Modi Politics
Santosh Deshmukh: संतोष देशमुखांच्या हत्येवेळी वाल्मिक कराड शेकडो किलोमीटर दूर! जामीन मिळणार का? वकिलांनी काय केला युक्तीवाद?

यामध्ये काँग्रेस प्रणित युपीए सरकारच्या काळात आणलेल्या अनेक कल्याणकारी योजनांपैकी तब्बल ३३ योजनांची नाव मोदी सरकारनं यापूर्वीच बदलली आहेत. यामध्ये रोजगार, शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग अशा विविध क्षेत्रातील योजनांचा यात समावेश आहे.

मोदी सरकारनं काँग्रेस सरकारच्या काळातील योजनांची बदलेली नावं
मोदी सरकारनं काँग्रेस सरकारच्या काळातील योजनांची बदलेली नावं

शहरांची बदलली नावं

दरम्यान, देशातील शहरांची नाव बदलणं हा देखील भाजपचा अजेंड्यावरील विषय राहिला आहे. त्यानुसार केंद्र सरकारनं आजवर अनेक शहरांची नाव बदलली आहेत. तसंच उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि इतर राज्ये जिथं भाजपची सरकारं आहेत, त्या ठिकाणची शहरांची नाव बदलण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्यानं मुस्लिम परंपरेतील नावांमध्ये बदल करणे हा सरकारचा अजेंडा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com