हिजाब वाद: कॉंग्रेस नेता बरळला, 'महिला हिजाब घालत नाहीत म्हणून बलात्कार होतात'

कर्नाटकमध्ये शाळा महाविद्यालयांमध्ये मुलींच्या हिजाब (Hijab Controversy) परिधान करण्यावरून वाद सुरू असताना या वादात अजून एक भर पडली आहे.
Congress Leader Zameer Ahmed
Congress Leader Zameer Ahmed Twitter/@ANI
Published on
Updated on

बंगळूर : कर्नाटकातील कॉलेजमध्ये सुरू झालेल्या हिजाब वादाचे पडसाद आता देशभऱात उमटू लागले आहेत. या मुद्द्यावरुन राजकारणातही खळबळ माजली आहे. अशातच काँग्रेसचे (Congress) नेते जमीर अहमद (Zameer Ahmed) यांनी या प्रकरणावर वादग्रस्त वक्तव्य करत या वादाला फुंकर घातली आहे. (Hijab Controversy latest news)

' इस्लाममध्ये हिजाब म्हणजे पर्दा. महिलेचे सौंदर्य लपविण्यासाठी हा पर्दा असतो. जेव्हा महिला हिजाब घालत नाही तेव्हा त्यांच्यावर बलात्कार होतो. पण हिजाब महिलांचे सौंदर्य लपवतो. आज हिंदुस्थानात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. कारण महिला हिजाबमध्ये राहत नाही. महिला हिजाब घालत नाही म्हणून बलात्कार होतात', असा अजब तर्क जमीर अहमद यांनी लावला आहे. ज्यामुळे या वादाला अधिकच तोंड फुटले आहे.

Congress Leader Zameer Ahmed
Hijab Controversy हिजाबसोबत भगव्या उपरण्यावरही बंदी; उच्च न्यायालयाचा दणका

दरम्यान, कर्नाटकमध्ये शाळा महाविद्यालयांमध्ये मुलींच्या हिजाब परिधान करण्यावरून वाद सुरू असताना या वादात अजून एक भर पडली आहे. हा व्हिडीओ दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतला असल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओत एका शाळेतील वर्गात काही विद्यार्थी नमाज पढताना दिसत आहेत. जो आता व्हायरल होत असल्याची माहिती काही माध्यमांनी दिली आहे.

तर दूसरीकडे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कर्नाटक सरकारने कनिष्ठ महाविद्यालयांच्या सुट्ट्या 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवल्या आहेत. कर्नाटकात हिजाब वाद चिघळल्यामुळे राज्य सरकारने 9 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत महाविद्यालये बंद करण्याचे आदेश दिले होते. या सोबतच सरकारने 16 फेब्रुवारीपर्यंत पदवी आणि डिप्लोमा महाविद्यालयांनाही बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शाळा महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्य प्रशासनाने दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com