
बातमीत थोडक्यात काय?
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने संसदेमध्ये 50% प्रतिनिधित्वाचा ऐतिहासिक निर्णय झाला असला तरी, इंटर पार्लियमेंटरी युनियनच्या अहवालातून महिला खासदार आणि कर्मचाऱ्यांवरील छळाचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
भारतासह 33 देशांतील 25% महिला खासदार लैंगिक हिंसा, 76% मानसिक छळ, 24% आर्थिक हिंसा आणि 13% शारीरिक छळ सहन करत आहेत; महिला कर्मचाऱ्यांमध्येही हे प्रमाण मोठे आहे.
ऑनलाईन माध्यमातून 60% महिला खासदारांना ट्रोलिंग, बदनामी, खोट्या बातम्या व कौटुंबिक माहिती व्हायरल करण्याच्या धमक्या मिळतात; अविवाहित, अल्पसंख्यांक आणि 40 वर्षांखालील महिला सर्वाधिक प्रभावित आहेत.
Extent of Harassment Faced by Women MPs Globally : केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वीच देशातील संसदेमध्ये महिलांना 50 टक्के प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांचे सक्षमीकरण आणि देशाच्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. मात्र, एका अहवालाने महिला खासदारांच्या सुरक्षेबाबतही धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
इंटर पार्लियमेंटरी युनियनच्या अहवालामध्ये भारतासह अन्य देशांमधील महिला खासदारांचा लैंगिक, शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियासह तब्बल 33 देशांमधील 25 टक्के महिला खासदारांना या छळाला सामोरे जावे लागत आहे. महिला खासदारांप्रमाणे संसदेतील महिला कर्मचाऱ्यांनाही असाच त्रास सहन करावा लागत आहे. तो आकडा तब्बल 36 टक्के एवढा आहे.
सध्या भारतामध्ये 116 महिला खासदार असून त्यापैकी लोकसभेत 75 खासदार आहेत. अहवालानुसार विविध देशांमधील संसदेतील महिला सदस्यांमध्ये मानसिक छळ सहन करणाऱ्या सदस्यांचा आकडा सर्वाधिक 76 टक्के एवढा आहे. तर 63 टक्के महिला कर्मचाऱ्यांच मानसिक छळ होतो. लैंगिक छळाचा आकडाही मोठाही आहे. तब्बल 25 टक्के महिला खासदारांना लैंगिक हिंसेला सामोरे जावे लागत आहे.
लैंगिक हिसेंप्रमाणे आर्थिकदृष्ट्याही महिला खासदारांना हिंसेला सामोरे जावे लागत आहे. हा आकडाही 24 टक्के एवढा आहे. विविध देशांमधील 13 टक्के महिला खासदार शारीरिक हिसेंचा सामना करत आहेत. संसदेतील महिला कर्मचाऱ्यांमध्ये हे प्रमाण 5 टक्के एवढे आहे.
प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष म्हणजे ऑनलाईन पध्दतीने महिला खासदारांचा छळ केला जात असल्याचे वास्तव आहे. ऑनलाईन माध्यमातून त्यांची बदनामी करणे, चुकीची माहिती व्हायरल करून प्रतिमा मलीन करणे, कौटुंबिक माहिती सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी महिला खासदारांना दिली जाते. हा आकडा तब्बल 60 टक्के एवढा आहे.
युनियनने कॉमनवेल्थ पार्लिमेंटरी असोसिएशन आणि आशियान इंटर पार्लिमेंटरी असेंब्लीच्या सहकार्याने हा सर्व्हे केला आहे. त्यासाठी भारतासह विविध देशांमधील 150 महिला खासदारांशी संवाद साधण्यात आला होता. प्रामुख्याने अविवाहित, अल्पसंख्यांक आणि 40 वर्षांपेक्षा वय कमी असलेल्या महिला खासदारांना हा त्रास सर्वाधिक असल्याचे अहवालातून समोर आले आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न :
प्रश्न: संसदेमध्ये महिलांना किती टक्के प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय झाला आहे?
उत्तर: महिलांना 50% प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
प्रश्न: सर्वाधिक कोणत्या प्रकारचा छळ महिला खासदारांना सहन करावा लागतो?
उत्तर: मानसिक छळ सर्वाधिक असून, 76% महिला खासदारांना तो सहन करावा लागतो.
प्रश्न: ऑनलाईन माध्यमातून छळाचा दर किती आहे?
उत्तर: ऑनलाईन माध्यमातून 60% महिला खासदारांना त्रास सहन करावा लागतो.
प्रश्न: कोणत्या गटातील महिला खासदारांना छळ सर्वाधिक होतो?
उत्तर: अविवाहित, अल्पसंख्यांक आणि 40 वर्षांखालील महिला खासदारांना.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.