रशिया-युक्रेनच्या युद्धात जगातील सर्वांत मोठे विमान उध्वस्त

रशियाच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यात अँतोनोव्ह एएन- २२५ अथवा म्रिया हे जगातील सर्वांत मोठे विमान उद्‍ध्वस्त झाले.
Antonov An-225 Mriya
Antonov An-225 MriyaSarkarnama
Published on
Updated on

किव्ह : रशियाच्या (Russia) युक्रेनविरोधात युद्ध पुकारले आहे. रशियाच्या सैन्याने किव्ह विमानतळाजवळ केलेल्या हल्ल्यात अँतोनोव्ह एएन- २२५ अथवा म्रिया हे जगातील सर्वांत मोठे विमान उद्‍ध्वस्त झाले. युक्रेन (Ukraine) सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडरवरूनही याला दुजोरा देण्यात आला आहे. या विमानाची पुर्नबांधणी करण्याचा निर्णय युक्रेनने जाहीर केला आहे. (Russia-Ukraine War Updates)

युक्रेनच्या गोत्सोमील या हवाई तळावर म्रिया विमान उभे होते. रशियाच्या सैन्याने तळाचा ताबा घेण्यासाठी हल्ला केला होता. या हल्ल्यात हे विमान उद्ध्वस्त झाले. या विमानाचे नेमके किती नुकसान झाले हे युक्रेनने स्पष्ट केलेले नाही. या महाकाय विमानाची बांधणी युक्रेन पुन्हा करणार आहे. याबाबत बोलताना युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा म्हणाले की, एन-२२७ म्रिया हे जगातील सर्वांत मोठे विमान होते. रशियाने म्रिया नष्ट केले असले तरी आमचे बलशाली, मुक्त आणि लोकशाही युरोपिय देशाचे स्वप्न कधीही भंगणार नाही. आम्ही नक्कीच विजयी होऊ.

सध्या युक्रेनने हल्ल्यानंतर नादुरुस्त झालेल्या म्रियाची डागडुजी सुरू केली आहे. विमानाचे एक इंजिन काढून ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भविष्यात ते हवेत झेपावणार आहे. पुढील पाच वर्षांत युक्रेने हे विमान पुन्हा तयार करणार आहे. यासाठी तीन अब्ज डॉलर (सुमारे २२ हजार ६७० कोटी रुपये) खर्च येणार आहे. अँतोनोव्ह कंपनीने याबाबत ट्विट करत अधिक माहिती देऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. आमचे तज्‍ज्ञ विमानाच्या तांत्रिक भागांचा तपासणी करीत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या विमानाच्‍या पंखांचा विस्तार २९० फूट आहे. विमानाची एकूण लांबी २७५.६ फूट असून उंची ५९.५ फूट आहे. त्याची माल वाहून नेण्याची क्षमता ६४० टन आहे. त्याच्या उड्डाणासाठी ६ वैमानिक लागतात.

Antonov An-225 Mriya
राष्ट्रवादीच्या देशमुख, मलिकांनंतर प्राजक्त तनपुरेंचा नंबर; 'ईडी'ची 90 एकर जमिनीवर टाच

अँतोनोव्ह -२२५ विमानाची वैशिष्ट्ये

- सोव्हिएत महासंघात युक्रेनचा समावेश असताना १९८० मध्ये विमानाची बांधणी

- सोव्हिएत महासंघ आणि अमेरिकेमध्ये अंतराळ क्षेत्रात स्पर्धा असताना या विमानाची निर्मिती

- रशियाचे बुरान अवकाशयान वाहून नेण्यासाठी या विमानाचा वापर करण्याचा उद्देश

- सोव्हिएत महासंघाचे विघटन झाल्यानंतर बुरान प्रकल्प रद्द; या विमानाच मालवाहू म्हणून वापर

- विमानाला म्रिया म्हणजेच स्वप्न असे टोपणनाव

- विमानाचे पहिले उड्डाण १ डिसेंबर १९८८ रोजी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com