राष्ट्रवादीच्या देशमुख, मलिकांनंतर प्राजक्त तनपुरेंचा नंबर; 'ईडी'ची 90 एकर जमिनीवर टाच

ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) आता सक्त वसुली संचालनालयाच्या (ED) फेऱ्यात अडकले आहेत.
Prajakt Tanpure
Prajakt TanpureSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आणखी एक मंत्री अडचणीत आले आहेत. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) हे आता सक्त वसुली संचालनालयाच्या (ED) फेऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या 90 एकर जमिनीवर ईडीने टाच आणली आहे. (ED Action on Prajakt Tanpure)

राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखान्याची 90 एकर जमीन जप्त करण्यात आली आहे. आधी ही तक्षशिला सिक्युरिटीजच्या नावावर ही जमीन होती. नंतर ती तनपुरे यांच्या प्रसाद शुगर अँड अलाईड अॅग्रो कंपनीने खरेदी केली होती. याचबरोबर तनपुरे यांच्या मालकीच्या 4.6 एकरच्या दोन बिगरशेती जमिनीही जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 26 ऑगस्ट 2019 रोजी गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीच्या आधारे ईडीने करचुकवेगिरीची चौकशी सुरू केली होती. चौकशीनंतर ईडीने तनपुरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

Prajakt Tanpure
युक्रेनमधून परतणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल झाला होता. राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना हा तत्कालीन अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालकांनी संगनमत करून कवडीमोल दराने तनपुरेंना विकला, असा आरोप करण्यात आला होता. हा कारखाना व कारखान्याच्या इतर मालमत्ता विकताना कोणत्याही योग्य प्रक्रियेचे पालन करण्यात आले नव्हते. या कारखान्याचे मूल्य 26.32 कोटी रुपये असताना त्याची केवळ 12.95 कोटी रुपयांनी विक्री झाली होती. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात अहवाल सादर केला असून, त्यावरील सुनावणी प्रलंबित आहे.

Prajakt Tanpure
राजकारण तापलं! भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी केंद्रीय मंत्री, आमदार-खासदारांसह राजभवन गाठलं

मलिक यांना रुग्णालयातून सोडणार

दरम्यान, नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने दोन दिवसांपूर्वी जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती आता सुधारली आहे. त्यांना रुग्णालयातून आज सोडण्यात येणार आहे, अशी माहिती मलिक यांची कन्या निलोफर मलिक यांना दिली. रुग्णालयातून सोडताच मलिक यांची रवानगी पुन्हा ईडीच्या कोठडीत होईल. नवाब मलिक यांना ईडीने 23 फेब्रुवारीला अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने ३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com