Sakshee Malikkh On Wrestlers Protest: कुस्तीपटूंचं आंदोलन थांबणार नाही...: साक्षी मलिकचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

Jantar Mantar Wrestlers Protest : दोन दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटू महिला आंदोलकांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला.
Sakshi Malik On Wrestlers Protest
Sakshi Malik On Wrestlers ProtestSarkarnama
Published on
Updated on

Sakshee Malikkh On Wrestlers Protest : एकीकडे राजधानी दिल्लीत नव्या संसद भवनाच्या इमारतीचे लोकार्पण होत होते, तर दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटू महिला आंदोलकांचे आंदोलन (Wrestlers Protest) चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. पोलिसी बळाचा वापर करत दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने कुस्तीपटूंना ताब्यात घेतले. या घटनेमुळे दिल्लीत एकच खळबळ उडाली होती. (Wrestlers' agitation will not stop...: Sakshee Malikkh's 'To' video goes viral)

Sakshi Malik On Wrestlers Protest
Shinde Vs Thackeray : दसरा मेळाव्यानंतर वर्धापन दिनावरुनही राजकारण तापणार; शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच...

या कुस्तीपटूंना रविवारी ताब्यात घेतल्यानंतर सोडून देण्यात आले. आंदोलक कुस्तीपटूंना त्यांच्या निषेधाच्या ठिकाणाहून हटवल्यानंतर सोमवारी (29 मे) जंतरमंतर वगळता इतर कोणत्याही योग्य ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी दिली जाईल. पण या घटनेमुळे हे आंदोलन सुरु राहणार की बंद पडणार याकडे महिला खेडाळूंचे लक्ष लागले होते. यावर आता कुस्तीपटू साक्षी मलिकने (Sakshi Malik) व्हिडीओ शेअर करत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचं सांगितलं आहे.

कुस्तीपटू साक्षी मलिक म्हणाली, “ रविवारी (२८ मे) आम्ही शांततेने मोर्चा काढत होतो पण पोलिसांनी आम्हाला जबरदस्तीने ताब्यात घेण्यास सुरुवात केली. आम्हाला अटक करत आमच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले. आम्ही शांततेत मोर्चा काढत होते. आमच्याकडून कोणत्याही सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तेचे नुकसान झाले नाही. पण तरीही एका महिलेवर 20-20 जण जबरदस्त करत होते. त्यांनी आमच्यावर किती अत्याचार केले हे तुम्ही स्वतःच समजू शकता, कालच्या या घटनेचे व्हिडीओ तुम्हीही पाहिले आहेत. (Wrestlers Protest Latest News)

"हा व्हिडिओ बनवण्याचे एक कारण म्हणजे आमचे समर्थक, जे अजूनही कुठेतरी गुरुद्वारामध्ये आमची वाट पाहत आहेत, त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, आज दिवसभर आम्ही भविष्यातील आंदोलन कसे करायचे याची रुपरेषा बनवत होतो. या रुपरेषेनुसारच पुढेही आंदोलन होईल. आम्ही मागे हटलो नाही, आंदोलन सुरूच राहील आणि यापुढे जो काही निर्णय होईल त्याबाबत आम्ही लवकरच कळवू. तुम्ही असेच सपोर्ट करत रहा. धन्यवाद.''

Sakshi Malik On Wrestlers Protest
Shinde Vs Thackeray : दसरा मेळाव्यानंतर वर्धापन दिनावरुनही राजकारण तापणार; शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच...

याआधीही साक्षी मलिकने एका ट्विटमध्ये आंदोलन संपले नसल्याचे म्हटले होते. “आम्ही जंतरमंतरवर सत्याग्रह करू. या देशात हुकूमशाही चालणार नाही. महिला कुस्तीपटूंचा सत्याग्रह असणार आहे. जर आम्ही परदेशी भूमीवर पदक जिंकू शकतो तर आपल्याच मातीत लढलेला लढा जिंकल्याशिवाय थांबणार नाही.” असा विश्वासच तिने व्यक्त केला होता.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com