B. S. Yediyurappa News : येडियुरप्पांचा ‘यु टर्न’ : सिद्धरामय्यांच्या विरोधात मुलगा विजयेंद्र लढणार नसल्याची केली घोषणा

हायकमांडने विजयेंद्र यांना वरुणामधून उमेदवारी देण्याचे मान्य केले आहे.
B. S. Yediyurappa and Son B.Y. Vijayendra
B. S. Yediyurappa and Son B.Y. VijayendraSarkarnama
Published on
Updated on

बंगळूर : माझा मुलगा विजयेंद्र यांनी वरुणा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी प्रतिनिधित्व करत असलेल्या शिमोगा जिल्ह्यातील शिकारीपुरा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहावे, अशी इच्छा व्यक्त करत अवघ्या एका दिवसांत माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (B. S. Yediyurappa) यांनी आपल्या म्हणण्यावर ‘यु टर्न’ घेतला आहे. (Yediyurappa's 'U Turn': Son Vijayendra will not fight against Siddaramaiah from Varuna)

बी. एस. येडियुरप्पा हे म्हैसूरमध्ये बोलत होते. त्यावेळी त्यांनी आपला मुलगा विजयेंद्र यांच्या विधानसभा मतदारसंघाबाबत भाष्य करत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात वरुणा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे संकेत दिले हेाते. मात्र, अवघ्या काही तासांतच येडियुरप्पा यांनी माघार घेतली आहे.

B. S. Yediyurappa and Son B.Y. Vijayendra
BJP News : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांविरोधात युडियुरप्पांचा मुलगा उतरणार मैदानात : माजी मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

विजयेंद्र हे शिकारीपूर येथूनच निवडणूक लढवणार आहेत. वरुणा मतदारसंघातून चांगला उमेदवार उभा करू. हायकमांडने वरुणा मतदारसंघासाठी विजयेंद्र यांच्या लढतीला सहमती दर्शवली होती. पण, मी स्वतः सांगितले की, मला शिकारीपुरातून थांबायचे आहे. या प्रकरणी मी हायकमांडला पटवून देईन, असे ते म्हणाले.

B. S. Yediyurappa and Son B.Y. Vijayendra
Karnataka BJP : भाजप आमदाराकडून श्रीराम यांच्या प्रतिमेचा अपमान ; कर्नाटकातील राजकारण तापलं

मी शिकारीपुरातून निवडणूक लढवणार नसल्याने विजयेंद्र यांनी तेथून निवडणूक लढवावी. हा माझा निर्णय आहे. विजयेंद्र यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शिकारीपुरा, ज्या मतदारसंघाने मला मुख्यमंत्री केले, तो मतदारसंघ सोडू शकत नाही. ते म्हणाले की, वरुणातील स्पर्धेच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची गरज नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com