Yogi Adityanath : पंतप्रधान पदाच्या प्रश्नावर योगींनी हातच झटकले, म्हणाले 'राजकारण माझा पूर्णवेळ व्यवसाय नाही'

Yogi Adityanath on PM Post : मी राजकारणात किती काळ राहीन याची एक कालमर्यादा आहे. मी कायमचा राजकारणात नाही असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.
Yogi Adityanath
Yogi AdityanathSarkarnama
Published on
Updated on

Indian Politics : मी मनापासून योगी आहे, मी काही कायमस्वरुपी राजकारणात आलो नाही. राजकारण हा माझा पूर्णवेळ व्यवसाय नाही. उत्तर प्रदेशातील जनतेची सेवा करण्यासाठी मी मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहे. माझ्या पक्षाने (भाजप) मला दिलेली जबाबदारी मी पार पाडत आहे," अशा शब्दांमध्ये पंतप्रधानपदाबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ते म्हणाले, मी राजकारणात किती काळ राहीन याची एक कालमर्यादा आहे. मी कायमचा राजकारणात नाही. उत्तर प्रदेशातील जनतेची सेवा करण्यासाठी मी मुख्यमंत्री पदावर आहे. मी मनापासून योगी आहे. मी कायमचे राजकारणात आलो नाही.

धर्म आणि राजकारण याबद्दलचा आपला दृष्टीकोण सांगताना ते म्हणाले, आपण धर्माला एका मर्यादित जागेपुरते मर्यादित करतो आणि राजकारणाला काही मोजक्या लोकांपुरते मर्यादित करतो आणि तिथेच समस्या उद्भवते. धर्माची राजकारणाशी सांगड घालणे चुकीचे आहे. राजकारणाचे उद्दिष्ट स्वार्थ पूर्ण करणे नाही तर समाजाचे भले करणे आहे. धर्माचे ध्येय देखील दान आहे. जेव्हा धर्माचा वापर स्वार्थी हेतूंसाठी केला जातो तेव्हा समस्या उद्भवतात; पण जेव्हा उद्देश परोपकारी असतो तेव्हा धर्म प्रगतीचा मार्ग मोकळा करतो.

"जर राजकारण स्वार्थाने चालवले गेले तर ते समस्या निर्माण करेल. पण जर ते अधिक चांगल्यासाठी असेल तर ते उपाय देईल. आपल्याला समस्येचा भाग बनणे किंवा तोडगा काढणे यापैकी एक निवडावे लागेल आणि माझा विश्वास आहे की धर्म देखील आपल्याला हेच शिकवतो. असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

"भारतीय तत्वज्ञानाने कधीही धर्माला स्वार्थी हेतूंशी जोडले नाही. त्याची उद्दिष्टे दुहेरी आहेत: सांसारिक जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा करणे आणि आध्यात्मिक मुक्ती मिळवणे. दोन्हीही शेवटी सेवेच्या उद्देशाने काम करतात. राजकारण हे सेवेच्या या भावनेला पुढे नेण्यासाठी फक्त एक व्यासपीठ आहे," असे ते म्हणाले.

वडील जीवंत असताना...

दरम्यान देशाचा पुढचा पंतप्रधान महाराष्ट्राचा असेल, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ३० मार्च रोजी पंतप्रधान मोदींच्या संघ मुख्यालयाच्या भेटीनंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांबाबत सध्या चर्चा सुरू आहे. त्यावरुन राऊतांनी हा दावा केला होता. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात आहे.

फक्त नरेंद्र मोदी हेच देशाचे नेतृत्व करतील. आपल्या संस्कृतीत वडील जिवंत असताना उत्तराधिकारीची चर्चा होत नाही असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com