काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या जितिन प्रसादांना योगींनी दिलेल्या खात्याची होतेय चर्चा

BJP|Congress|Yogi Adityanath|UP|Jitin Prasad: भाजपने आसाममध्ये हेमंत बिस्वा सरमा आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले एन बीरेन सिंग यांना मणिपूरमध्ये मुख्यमंत्री करण्यात आले आहे.
JItin Prasad & Yogi Adityanath
JItin Prasad & Yogi AdityanathSarkarnama
Published on
Updated on

Yogi Government : योगी सरकार (Yogi Government) 2 मध्ये शपथ घेतलेल्या सर्व मंत्र्यांना सोमवारी (ता. 29 मार्च) संध्याकाळी त्यांच्या खात्यांचे वाटप करण्यात आले. काँग्रेस (Congress) सोडून भाजपमध्ये (BJP) दाखल झालेल्या जितीन प्रसाद (Jitin Prasad) यांची राजकीय उंची सातत्याने वाढत आहे. खाते वाटपात जितिन यांना विशेष महत्त्व मिळाले असून सार्वजनिक बांधकाम विभागा सारख्या (PWD) मोठ्या खात्याचा पदभार त्यांच्यावर सोपवण्यात आला आहे. योगी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात हे खाते उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांच्याकडे होता. अशा स्थितीत भाजप जितिन प्रसादांवर एवढा मेहरबान का आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

JItin Prasad & Yogi Adityanath
पवारांनी कधी गिळले हे शिवसेनेला सुद्धा कळले नाही!

उत्तर प्रदेशातील योगी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) खाते वाटप धक्कादायक मानले जात आहे. केशव प्रसाद मौर्य यांच्याकडून हे खाते घेऊन काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले ब्राह्मण नेते जितिन प्रसादांना देण्यात आले. जितीन प्रसाद यांची पीडब्ल्यूडी मंत्रीपदी नियुक्ती झाल्याने राजकीय वर्तुळात अनेकांना आश्चर्य वाटत आहे. दुसऱ्या पक्षातील नेत्याला एवढे मोठे मंत्रिपद कसे मिळाले. पीडब्ल्यूडी विभाग हा बहुतांशी राज्य सरकारमधील क्रमांक दोनच्या नेत्यांकडे असल्याचेही एक कारण आहे. केशव यांच्या आधी सपा सरकारमध्ये शिवपाल यादव पीडब्ल्यूडी मंत्री होते आणि बसपा सरकारमध्ये नसीमुद्दीन सिद्दीकी आणि आता जितिन प्रसाद यांच्याकडे या महत्वाच्या खात्याची जबाबदारी आली आहे.

जितिन प्रसादांचा अनुभव कामी आला

पीडब्ल्यूडी विभाग नेहमीच चर्चेत असतो. पूर्वीच्या योगी सरकारमध्ये हा विभाग केशवप्रसाद मौर्यांकडे होता, त्यानंतर निविदा प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी सर्व प्रक्रिया अवलंबण्यात आल्या. यानंतरही आरोप-प्रत्यारोप होतच राहिले, त्यामुळेच या अत्यंत महत्त्वाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी जितीन यांच्याकडे देण्यात आली आहे. याचे कारण केंद्रात मंत्री असताना त्यांच्याकडे अनेक महत्त्वाची मंत्रालये होती, मात्र, त्यांच्यावर कोणीही आरोप करत नव्हते.

केंद्रीय राजकारणातील अनुभवाच्या जोरावर योगी सरकारने जितिन प्रसाद यांना पीडब्ल्यूडीची जबाबदारी देण्यात आली आहे. जितिन हे काँग्रेसशासित केंद्र सरकारमध्ये भूपृष्ठ वाहतूक मंत्री होते. त्यामुळे त्यांचा अनुभव पाहता योगी सरकार 2 मध्ये PWD अवजड विभागाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे समजते. भाजपमध्ये प्रवेश करताच योगी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये त्यांना तंत्रशिक्षण मंत्री करण्यात आले होते मात्र, यावेळी त्यांच्या अनुभवानुसार काम सोपवण्यात आले आहे. पीडब्ल्यूडी जितीन यांना दिले जाणे हा भविष्यातील एक मोठा संदेश आहे, जो राजकीय समज असलेल्या लोकांना माहित आहे.

इतर पक्षातील असंतुष्ट नेत्यांना दिला संदेश

जितिन प्रसाद हे स्वच्छ प्रतिमेचे मानले जातात आणि अजूनही ते तरुण नेते आहेत. अशा स्थितीत भाजपही त्यांना भावी नेता म्हणून पुढे करत असून, त्याचवेळी काँग्रेससह अन्य पक्षांतील नाराज नेत्यांनाही मोठा संदेश दिला आहे. त्यामुळेच जितिन प्रसाद यांना मंत्रिमंडळात ठेवण्यात आले असून त्यांना केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे असलेले खाते देण्यात आले आहे. त्यांना पीडब्ल्यूडीचे मंत्री करून भाजपने काँग्रेस नेत्यांसाठी मोठा संदेश दिला असून काँग्रेसचा एक मोठा चेहराही भाजपमध्ये जाऊन मोठा होऊ शकतो.

जितिन यांना मोठा पोर्टफोलिओ देऊन आणि भाजपमध्ये त्यांचा राजकीय उदय करून, पक्षाने हा समज मोडण्याचा प्रयत्न केला आहे, भाजप इतर पक्षांच्या नेत्यांवर कमी विश्वास ठेवतो आणि त्यांना राजकीय महत्त्व देत नाही. अशाप्रकारे जितीन प्रसाद यांना पीडब्ल्यूडी आणि ब्रजेश पाठक यांना उपमुख्यमंत्री बनवून ते भाजपच्या दिशेने आले तर त्यांना पश्चाताप करावा लागणार नाही, हे इतर पक्षांच्या नेत्यांनाही सूचक आहे.

JItin Prasad & Yogi Adityanath
पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती; भाजपचे पाच आमदार निलंबित

तथापि, भाजपने यापूर्वीही बसपच्या नेत्यांना सरकारमध्ये उच्च पदे दिली होती, ज्यामध्ये स्वामी प्रसाद मौर्य ते दारा सिंह चौहान आणि धरमसिंग सैनी यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले होते. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांना राज्यसभा सदस्य तसेच केंद्रात मंत्री बनवण्याबरोबरच आसाममध्ये हेमंत बिस्वा सरमा आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले एन बीरेन सिंग यांना मणिपूरमध्ये मुख्यमंत्री करण्यात आले आहे.

भाजपसाठी अडचणीचे निवारक बनले होते जितिन प्रसाद

ब्राह्मणांच्या मुद्द्यावरून पक्ष आणि योगी सरकारला घेरले असताना जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. जितिन प्रसाद यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. जितिन यांनी काँग्रेस सोडली, यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता, कारण ते गांधी घराण्याच्या जवळचे मानले जात होते. अशाप्रकारे, जितिन यांच्या प्रवेशानंतर भाजपला विरोधकांची ब्राह्मणविरोधी कथन मोडून काढण्यास मदत झाली. यूपीच्या राजकारणात आलेल्या या तरुण नेत्याने काही वेळातच योगी-मोदींची मने जिंकली आणि त्यांना पुन्हा मंत्री बनवलेच नाही, तर त्यांचा राजकीय उंचीही वाढला आहे.

जितिन प्रसादांच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलले

भाजप प्रवेशानंतर जितिन यांचा राज्यपाल कोट्यातून एमएलसी करून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आणि योगी सरकारच्या पहिल्या कार्यकाळाच्या शेवटच्या मुदतीमध्ये त्यांना तंत्रशिक्षण मंत्रीपद देण्यात आले. जितिन प्रसाद भाजपमध्ये दाखल झाले आणि प्रबोधनपर परिषदांमधून भाजपच्या बाजूने वातावरण निर्माण करू लागले. शेतकरी आंदोलन आणि लखीमपूरच्या घटनेमुळे नुकसान होण्याची शक्यता असलेल्या जितीन प्रसाद यांच्या राजकीय बालेकिल्ल्यात भाजपने विजय मिळवला. अशा परिस्थितीत शाहजहांपूर, लखीमपूरखेरी, सीतापूर, पिलीभीत, बहराइच आणि बरेली या जागांवर भाजपने चांगली कामगिरी केली. त्यामुळे भाजपने त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिले आणि त्यांचा दर्जाही वाढवला, असे बोलले जात आहे.

JItin Prasad & Yogi Adityanath
इम्रान खान यांचा घोडेबाजार; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर पहिली कुऱ्हाड

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या राजकारणात पीडब्ल्यूडी मंत्रालय हा नेहमीच मलईदार आणि राजकीय प्रभावशाली विभाग मानला जातो आणि या विभागाच्या कंत्राटदारांवर एका विशिष्ट जातीचे वर्चस्व राहिले आहे. जितिन यांना हे खाते देण्यात आल्याने ठाकूर-ब्राह्मण यांच्यात वर्चस्वाच्या युद्धाची चर्चाही सुरू झाली आहे. हे मलाईदार खाते पहिल्यांदा एका ब्राम्हण मंत्र्याला मिळाले आहे. जितिन यांचे लोकांशी आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत चांगले संबध आहेत. याचाही फायदा त्यांना झाल्याची चर्चा आहे. त्यांच्यावर टाकलेली ही महत्वपूर्ण जबाबदारी ते कशी पार पाडतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com