Yogi Adityanath Statement: अतिक आणि अशरफ अहमद यांच्या खुनानंतर योगींचं मोठं विधान, म्हणाले, आता कोणताही माफिया...

After Atique Ashraf Murder Case: उत्तर प्रदेश दंगलीचे राज्य ही आपली ओळख लवकरच पुसून काढणार...
Yogi Adityanath News
Yogi Adityanath NewsSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुप्रसिद्ध गुन्हेगार, राजकारणी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांना पोलीस बंदोबस्तातच तीन मारेकऱ्यांनी गोळ्या झाडत हत्या केली होती. या घटनेनंतर उत्तर प्रदेशमधील या घटनेनंतर प्रयागराजमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं होतं. तसेच या हत्येवरुन उत्तर प्रदेशसह देशभरात विरोधकांनी योगी सरकारवर हल्ला चढविला होता. यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे लखनऊ आणि हरदोई जिल्ह्यात एक हजार एकरवर टेक्स्टाइल पार्क उभारण्यासंबंधी सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्याच्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशमधील कायदा व सुव्यवस्थेविषयी भाष्य केलं. तसेच उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारी संपुष्टात येत असल्याची ग्वाही देखील योगी आदित्यनाथ यांनी यावेळी बोलताना दिली. यावेळी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयुष गोयल देखील उपस्थित होते.

Yogi Adityanath News
Mumbai Fraud Case: धक्कादायक! जुहूतील मोक्याची व्यावसायिक जागा बळकावण्यासाठी वापरला चक्क न्यायालयाचा बनावट आदेश!

योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) म्हणाले,, २०१७ आधी उत्तर प्रदेश सर्वात वाईट कायदा आणि सुव्यवस्था आणि दंगली या दोन गोष्टीसाठी ओळखले जात होते. काही जिल्ह्यांचे नाव ऐकले तरी लोकांना भीती वाटायची. आता कुणालाही कोणत्याही जिल्ह्याला घाबरण्याची गरज नाही. एकेकाळी इतरांमध्ये दहशत पसरवणारे आज स्वतः दहशतीखाली आहेत असल्याचंही योगी म्हणाले.

तसेच योगी सरकारने अतिक आणि अशरफ अहमद यांच्यावर पोलिसांसमोरच झालेला हल्ला आणि पोलिसांच्या चकमकीत अतिकचा मुलगा असदचा झालेला मृत्यू प्रकरणांची न्यायिक आणि विशेष चौकशी पथकाकडून चौकशी होणार असल्याचे स्पष्ट केलं आहे.

Yogi Adityanath News
Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींना दिलासा नाहीच ; 'मोदी' बाबतची याचिका फेटाळली ; आता सुप्रीम कोर्टात..

अतिक आणि अशरफ अहमद यांच्यावर पोलिसांसमोरच झालेला हल्ला आणि पोलिसांच्या चकमकीत अतिकचा मुलगा असदचा झालेला मृत्यू. यावरून विरोधकांनी सरकारविरोधात टीकेचा सूर लावला. या दोन्ही प्रकरणांची न्यायिक आणि विशेष चौकशी पथकाकडून चौकशी होणार असल्याचे योगी सरकारने जाहीर केले आहे. लखनऊ येथील कार्यक्रमात बोलत असताना आदित्यनाथ म्हणाले की, आज उत्तर प्रदेशमध्ये कोणताही माफिया दहशत पसरवू शकणार नाही. प्रत्येक जिल्हा आणि जिल्ह्याची ओळखही सुरक्षित आहे.

आतापर्यंत ३५ लाख कोटींची गुंतवणूक..

योगी आदित्यनाथ यांनी पीएम मित्र योजनेसाठी उत्तर प्रदेश राज्याला निवडल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी देशातला नवीन टेक्स्टाइल हब उत्तर प्रदेशमध्ये बनण्यासाठी हा करार काम करेल.तसेच मागच्या सहा वर्षांत भाजपाकडून प्रयत्न केले जात असल्यामुळे राज्यात अनेक गुंतवणुकीचे प्रस्ताव येत आहे. आतापर्यंत ३५ लाख कोटींची गुंतवणूक आणण्यात यश आल्याचेही योगी आदित्यनाथ म्हणाले.

Yogi Adityanath News
Ajit Pawar News : अजित पवारांनी भाजपशी कुठलाही संपर्क केला नाही, बावनकुळेंनी केले स्पष्ट !

आता माफिया उद्योगपतींना धमकावणार नाही!

उत्तर प्रदेश दंगलीचे राज्य ही आपली ओळख लवकरच पुसून काढणार असल्याचा विश्वासही योगी यांनी व्यक्त केला आहे. २०१२ ते २०१७ दरम्यान प्रत्येक तिसऱ्या दिवशी आधी इथे दंगली होत होत्या. या काळात तब्बल ७०० दंगलींची नोंद झाली. २००७ ते २०१३ दरम्यान ३६४ दंगलींची नोंद झाली.

राज्यात २०१७ ते २०२३ दरम्यान एकही दंगल उसळलेली नाही. एकदाही कर्फ्यू लावण्याची गरज पडली नाही. उद्योग आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ही अतिशय उत्तम परिस्थिती आहे. आता कोणताही माफिया किंवा व्यावसायिक गुन्हेगार उद्योगपतींना धमकवणार नाही असल्याचंही योगी यावेळी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com