दिल्ली : वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रसारक आणि भारताने फरारी घोषित केलेल्या झाकीर नाईक याला कतार येथे होत असलेल्या फिफा विश्वचषकासाठी (FIFA WORD CUP 2022) आमंत्रित करण्याचे वृत्त आले आहे. केंद्रिय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मंत्री हरदीपसिंग पुरी (HardeepSingh Puri) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मला खात्री आहे की, भारत या प्रकरणी संबधित अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू भक्कमपणे मांडेल. मात्र यानंतर पुरी यांनी, नाईकला निमंत्रण दिल्याबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे म्हंटले आहे.
झाकीर नाईक मलेशियात राहतो :
हरदीप सिंग पुरी एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होते. 2016 मध्ये नाईक भारत सोडून मलेशियाला गेला होता, जिथे त्याला कायमस्वरूपी निवासस्थान देण्यात आले होते. भारताने मलेशियाकडे त्याच्या प्रत्यार्पणाची विनंती केली आहे. कतारने नाईक यांना फिफा विश्वचषकासाठी निमंत्रण दिल्याबद्दल विचारले असता पुरी म्हणाले की, मला याबाबत कोणतीही माहिती नाही.
भाजपच्या प्रवक्त्यांनीही निषेध केला :
भारत निषेध नोंदवेल का, असे विचारले असता ते म्हणाले की, मला खात्री आहे की भारत या प्रकरणी निषेध नोंदवेल. नाईकबद्दल आमची काही भूमिका आहे. मला खात्री आहे की या संबंधित अधिकार्यांकडे तीव्र निषेध नोंदवला जाईल. यापूर्वी भाजपचे प्रवक्ते सॅव्हियो रॉड्रिग्ज यांनी भारतीय फुटबॉल संघटना आणि कतारला भेट देणाऱ्या प्रेक्षकांना कतार फिफा विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.
भारत सरकारने झाकीर नाईकचे इस्लामिक रिसर्च फाउंडेशनवर मोठी कारवाई करत या संघटनेला (IRF) बेकायदेशीर घोषित केले आहे आणि या संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे.
विशेष म्हणजे झाकीर नाईकवर भारतात मनी लाँड्रिंग आणि द्वेषपूर्ण भाषणांचा आरोप आहे. या वर्षी मार्चमध्ये गृह मंत्रालयाने नाईक यांनी स्थापन केलेल्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (IRF) ला बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केले आणि त्यावर पाच वर्षांसाठी बंदी घातली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.