

मोहोळ : " धनगर समाजाला आरक्षण तर मिळालेच पाहिजेच,पण त्याबरोबर समाजबांधवांची शैक्षणिक व सामाजीक क्षेत्रातही उत्तरोत्तर प्रगती झाली पाहिजे. यासाठी सामुहीक प्रयत्न करणे गरजेचे आहे," असे प्रतिपादन इंदोरच्या होळकर घराण्याचे तेरावे वंशज श्रीमंत युवराज भुषणसिंह होळकर यांनी केले.
येथील शासकीय विश्रामगृहा मध्ये तालुक्यातील धनगर समाजाच्या शिष्टमंडळाच्या बैठकीमध्ये ते बोलत होते . यावेळी मोहोळ तालुका धनगर समाजाच्या वतीने तालुकाध्यक्ष भागवत शिंदे यांनी त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विठ्ठल कारंडे , परमेश्वर सरक , जगु गुंड , सज्जन पाटील , शामराव पाटील, शहाजी पाटील, कृष्णदेव वाघमोडे, गणेश गावडे, नामदेव नरूटे , बिरूदेव देवकते, संजय जरग ,बाळासाहेब वाघमोडे, गणेश गावडे, शिवाजी पुजारी, दाजी गाढवे, भिवा कोकरे , बबन सरक गुरूजी , संजय पडवळकर, दिलिप टेकाळे, नामदेव नरूटे, सुभाष देवकर आदीसह समाजबांधव उपस्थित होते .
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.