कदमांच्या विरुद्ध भाजपचे जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांचे बंड !

दापोलीत 2014 मध्ये सुमारे 13 हजार मते मिळाली होती, त्यानंतर भाजपची ताकद वाढून ही मते सुमारे 40 हजार झाली आहेत, त्यामुळे भाजप अनेकांचा निकाल लावू शकतो.
BJP 's Sathe filing nomination
BJP 's Sathe filing nomination
Published on
Updated on

दाभोळ : भाजपचे जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांनी भाजपमुक्त रत्नागिरी जिल्हा या पक्षाच्या वरिष्ठांच्या संकल्पनेला विरोध करत बंडाचा  झेंडा फडकवला आहे.  थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरत वरिष्ठांच्या निर्णयाला विरोध तर केला आहेच शिवाय  पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांच्या अडचणी देखील वाढविल्या आहेत.

शिवसेना व भाजपने नुकतीच विधानसभा निवडणुकीत युती केली असून रत्नागिरी जिल्ह्यातून पाचही विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेले आहेत, त्यामुळे पहिल्यांदाच  जिल्ह्यामध्ये भाजपमुक्त जिल्हा ही संकल्पना भाजपच्या राज्यातील नेतृत्वाने राबवली आहे. वरिष्ठांच्या या संकल्पनेला छेद देत कार्यकर्त्यांनी स्थानिक नेतृत्वावर उमेदवारीसाठी दबाव आणला. 

त्यामुळे कोअर कमिटीच्या बैठका घेऊन दापोली भाजपने दापोली विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊन, भाजपचे जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  साठे यांचा दापोली विधानसभा मतदार संघातील पहिलाच उमेदवारी अर्ज असून, रत्नागिरी जिल्ह्यात भाजपकडून पहिला बंडाचा झेंडा आज रोवला गेला आहे.

दापोलीत 2014 मध्ये सुमारे 13 हजार मते मिळाली होती, त्यानंतर भाजपची ताकद वाढून ही मते सुमारे 40 हजार झाली आहेत, त्यामुळे भाजप अनेकांचा निकाल लावू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com