माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकरांचे फलटण प्रेम !

लोकसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील माण आणि फलटण विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत माढा लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह निंबाळकर यांना माळशिरस मतदारसंघातून एक लाखांचे मताधिक्‍य मिळाले.
Ranjitsinh_nimbalkar
Ranjitsinh_nimbalkar
Published on
Updated on

सोलापूर  : लोकसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील माण आणि फलटण विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत माढा लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह निंबाळकर यांना माळशिरस मतदारसंघातून एक लाखांचे मताधिक्‍य मिळाले. त्यावरच त्यांचा विजय निश्‍चित झाला आणि खासदारकीची माळ त्यांच्या गळ्यात पडली. मात्र, आदर्श संसद ग्राम योजनेअंतर्गत खासदार निबांळकर यांनी फलटण तालुक्‍यातील पिंपरद गाव निवडले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी आदर्श ग्राम संसद योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत खासदारांनी त्यांच्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेऊन आदर्श बनवावे, त्यासाठी दरवर्षी केंद्र सरकारकडून विशेष निधी देण्याची तरतूद करण्यात आली. दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांचा पराभव करीत निबांळकर यांनी मोठा विजय मिळविला. 


त्यांच्या विजयात मोहिते-पाटील यांचा मोठा वाटा राहीला. त्यामुळे खासदार माढा मतदारसंघासाठी अर्थात माळशिरस तालुक्‍यातील विकास कामांसाठी मोठा निधी आणतील, असा विश्‍वास मतदारांना आहे. मात्र, खासदार निंबाळकरांनी पहिल्याच टप्प्यात आदर्श संसद ग्राम योजनेअंतर्गत पिंपरद गाव निवडले. त्यामुळे माढा, करमाळा, माळशिरस तालुक्‍यातील मतदारांमधून नाराजीचा सूर निघू लागला आहे. दरम्यान, दुसऱ्या अथवा तिसऱ्या टप्प्यात माळशिरस तालुक्‍यातील गाव निवडले जाईल, असे निंबाळकर यांनी सांगितले.

खासदार महास्वामींनी निवडले सलगर बु.
लोकसभा निवडणूक होऊन आता सात महिन्यांचा कालावधी लोटला. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांनी आदर्श संसद ग्राम योजनेत मंगळवेढ्यातील सलगर बु. गाव निवडले आहे. परंतु, दोन्ही खासदारांनी गाव निवडून आता दोन महिन्यांहून अधिक कालावधी संपला असतानाही गावांच्या विकासासाठी अद्याप निधी मिळालेला नाही. निधीसाठी दोन्ही खासदार केंद्राकडे पाठपुरावा करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com