खासदार महास्वामी यांच्या जातीच्या दाखल्यावर शनिवारी सुनावणी 

खासदार महास्वामी व प्रमोद गायकवाड या दोघांचेही म्हणणे या सुनावणीत ऐकून घेतले जाणार आहे.- छाया गाडेकर, सहायक आयुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती
dr-jaisidheshwar-swami
dr-jaisidheshwar-swami
Published on
Updated on

सोलापूर  : सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी तथा नुरदय्यास्वामी गुरुबसप्पा हिरेमठ यांच्याकडे असलेला बेडा जंगम जातीचा दाखला बनावट असल्याची तक्रार रिपाइंचे प्रमोद गायकवाड यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे केली आहे. 

हिरेमठ यांच्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू लिंगायत असा उल्लेख असतानाही त्यांनी बेडा जंगमचे प्रमाणपत्र काढल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. या तक्रारी अर्जावर शनिवारी (ता. 31) सकाळी 11 वाजता सामाजिक न्यायभवन येथे सुनावणी होणार आहे. 

गायकवाड यांनी अर्जासोबत हिरेमठ यांच्या जातीच्या दाखल्याची झेरॉक्‍स, गौडगाव जिल्हा परिषद शाळेच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची झेरॉक्‍स सोबत जोडली आहे. खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांना 1982 मध्ये हे जातीचे प्रमाणपत्र तहसीलदारांच्या सहीने वितरित करण्यात आले आहे. 

सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी मंद्रूप येथील विश्‍वनाथ हिरेमठ यांच्याकडे असलेला बेडा जंगम जातीचा दाखला जात प्रमाणपत्र पडताळणी समिती व उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. या प्रकरणी दंडाचीही शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आता खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्या जातीच्या दाखल्याबद्दल तक्रार प्राप्त झाली आहे. या प्रकरणी आपण न्यायालयातही धाव घेतली असल्याची माहिती तक्रारकर्ते प्रमोद गायकवाड यांनी दिली. 

अक्कलकोट तहसील कार्यालय हतबल 
जानेवारी 1982 ते फेब्रुवारी 1982 कालावधीत अक्कलकोट तहसील कार्यालयातून अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र किती जणांना वितरित केले आहेत, याची माहिती प्रमोद गायकवाड यांनी माहितीच्या अधिकारातून अक्कलकोट तहसील कार्यालयाला विचारली आहे. अक्कलकोट तहसील कार्यालयात याबाबतची कोणतीही कागदपत्रे आढळत नसल्याची लेखी माहिती गायकवाड यांना देण्यात आली आहे. कागदपत्रे शोधण्यात अक्कलकोट तहसील कार्यालय हतबल झाल्याचे यातून समोर आले आहे. 

प्रमोद गायकवाड यांचा अर्ज आज प्राप्त झाला आहे. या अर्जावर शनिवारी (ता. 31) सकाळी 11 वाजता सात रस्ता येथील सामाजिक न्याय भवनात सुनावणी घेण्यात येणार आहे. खासदार महास्वामी व प्रमोद गायकवाड या दोघांचेही म्हणणे या सुनावणीत ऐकून घेतले जाणार आहे. 
- छाया गाडेकर, सहायक आयुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com