अक्कलकोट : भाजपाने वेटिंगवर ठेवलेल्या आमदार सिद्धाराम म्हेत्रे यानी आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसतर्फे लढण्याचा निर्णय घेतलेला असून याबाबतची घोषणा उद्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत करणार असल्याचे काँग्रेस सूत्रांनी सांगितले.
आमदार सिद्धाराम म्हेत्रे हे भाजपमध्ये प्रवेश करणार व भाजपतर्फे उभे राहणार ही चर्चा गेली दोन महिने मतदारसंघात सुरू होती अनेक मुहूर्त गेले तरी आमदार म्हेत्रे यांचा भाजपा प्रवेश झाला नाही.
घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी आमदार म्हेत्रे यांचा भाजपा प्रवेश होणार होता मात्र तो होऊ शकला नाही यामुळे आमदार म्हेत्रे यांनी अपक्ष किंवा काँग्रेसतर्फे निवडणूक लढविण्याचा विचार केला होता. मात्र माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी आज आमदार म्हेत्रेनी भेट घेऊन चर्चा केली.
या पार्श्वभूमीवर आमदार म्हेत्रे यांनी त्यांच्या समर्थकांची व काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक उद्या बुधवारी दीड वाजता अक्कलकोट येथे बोलविली आहे या कार्यकर्त्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा विचार घेऊन काँग्रेस पक्षातर्फे पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय आमदार म्हेत्रे घोषित करन्याची शक्यता आहे. त्यामुळे अपक्ष लढण्याची शक्यता मावळली आहे.
काल सोमवारी सायंकाळी अक्कलकोट विधानसभेची जागा रयत शेतकरी संघटनेला सुटल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले होते रयत शेतकरी संघटना ही भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढविणार आहे .
या पार्श्वभूमीवर भाजपाचे तालुकाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी व भाजपाने वेटिंगवर ठेवलेले आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यापैकी कोणाला तिकीट मिळणार यावर चर्चा होत होती काल रात्री उशिरा महायुतीची उमेदवारी सचिन कल्याणशेट्टी यांना मिळणार असल्याचे निश्चित झालेले होते या पार्श्वभूमीवर म्हेत्रेसमर्थकांनी आ. म्हेत्रे काँग्रेसच्या चिन्हावर उभे राहतील असे सांगितले.
आमदार म्हेत्रे यांचा भाजप प्रवेश हुकल्यामुळे पालकमंत्री विजय देशमुख यांची मोठी नामुष्की झाली आहे सहकार मंत्री सुभाष देशमुख यानी पालकमंत्री विजय देशमुख यांच्यावर कुरघोडी करीत त्यांचे समर्थक सचिन कल्याणशेट्टी यांना उमेदवारी मिळवून दिली. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गटात निराशेचे वातावरण पसरले आहे भाजपतर्फे इच्छुक असलेले आनंद तानवडे, शिवानंद पाटील व गणेश माने देशमुख यांची नावे मागे पडली व कल्याणशेट्टी यांनी उमेदवारीवर झेंडा रोवला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.