कोरोनाच्या काॅलर ट्यूनला रोहित पवार, बाळा नांदगावकर विटले!

सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क वापरा, कारणाशिवाय बाहेर पडू नका असे विविध संदेश असणारी काॅलरट्यून आता सवयीची झाली आहे. या आधीच्या काॅलर ट्यून मध्ये सुरुवातीला एक व्यक्ती खोकत असल्याचा आवाज यायचा. त्यालाही लोक वैतागले होते.
Bala Nandgaonkar and Rohit Pawar Fade up with Corona Caller Tune
Bala Nandgaonkar and Rohit Pawar Fade up with Corona Caller Tune

पुणे : देशात कोरोनाची साथ आली आणि लोकांवर विविध माध्यमांतून जनजागृतीच्या संदेशांचा मारा सुरु झाला. दूरसंचार कंपन्याही याला अपवाद नव्हत्या. मोबाईलवरुन फोन केल्यावर सध्या ऐकू येते ती कोरोनाची जनजागृती करणारी काॅलर ट्यून. लोक या ट्यूनला आता वैतागले आहेत. 

सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क वापरा, कारणाशिवाय बाहेर पडू नका असे विविध संदेश असणारी काॅलरट्यून आता सवयीची झाली आहे. या आधीच्या काॅलर ट्यून मध्ये सुरुवातीला एक व्यक्ती खोकत असल्याचा आवाज यायचा. त्यालाही लोक वैतागले होते. सध्याही हे संदेश देणारी ट्यून सुरुच आहे. ही संपूर्ण ट्यून संपेपर्यंत आवश्यक तो काॅल लागतच नाही, असा अनुभव येतो आहे.

त्यामुळे आता काही नेत्यांनीही आता ही ट्यून नको असा सूर लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटरवरुन 'किती जणांना वाटते की कोरोनाबाबतची ट्यून ऐच्छिक करायला हवी, असा प्रश्न विचारला आहे. त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. काहींनी याची थट्टा उडवली आहे तर काहींनी ही ट्यून बंद करावी, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दुसरीकडे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही ही ट्यून बंद करण्याची मागणी केली आहे. ''कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाने गेली अनेक महिने कॉलर ट्यून म्हणून कोरोना ची माहिती देण्यात येत आहे. परंतु आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे व या कॉलर ट्यून मुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असले तरी विलंब होतो अथवा लागत नाही. त्यामुळे जी काही जनजागृती करायची ती विविध माध्यमातून जाहिरातीद्वारे होतच आहे. त्यामुळे आता ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी,'' असे नांदगावकर यांनी म्हटले आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com