दाऊदची हजारो कोटींची  ब्रिटनमधील मालमत्ता जप्त 

dawood ibrahim
dawood ibrahim

लंडन :  आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या नावावर असलेली मालमत्ता ब्रिटनने आज जप्त केली, त्यामुळे त्याच्या तेथील साम्राज्याला मोठा धक्का बसला आहे. भारत सरकारच्या पाठपुराव्यामुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले जाते. 

स्थानिक वर्तमानपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊदने 21 वेगवेगळ्या नावांनी ब्रिटनमध्ये मालमत्ता जमा केली होती. त्यात वॉरविकशायरमधील एक हॉटेल आणि इतर निवासस्थानांचा समावेश आहे. या मालमत्तेची किंमत 6.7 अब्ज डॉलर  आहे. 
"डी कंपनी' या नावाने दाऊद 16 देशांमध्ये कारवाया करत असल्याचे उघड झाले आहे. जगातील मोस्ट वॉंटेड दहशतवाद्यांच्या यादीतही त्याचा समावेश करण्यात आला आहे. कोलंबियाचा अमली पदार्थांचा तस्कर पाब्लो एक्‍सोबार याच्याखालोखाल दाऊद हा जगातील सर्वांत श्रीमंत दहशतवादी असल्याचे मानले जाते. 
दाऊद इब्राहिम हा मुंबईत 1993 मध्ये झालेल्या स्फोटातील मुख्य सूत्रधार आहे. भारताने 2015 मध्ये ब्रिटन सरकारला दाऊदच्या संपत्तीबाबतचे दस्तावेज दिले होते. त्यानंतर त्यावर कारवाईचे आश्‍वासन ब्रिटनने दिले होते. 

ब्रिटनकडील नावे 
ब्रिटिश सरकारकडे असलेल्या नोंदणी रजिस्टरमध्ये दाऊद इब्राहिमने 21 वेगवेगळ्या नावांनी या मालमत्ता जमा केल्या आहेत. त्या नावांमध्ये अब्दुल शेख, इस्माइल, अब्दुल अजीज, अब्दुल हमीद, अब्दुल रहमान, शेख मोहम्मद, अनीस, इब्राहिम शेख, मोहम्मद भाई, बड़ा भाई, दाऊद भाई, इकबाल, दिलीप, अजीज, इब्राहिम, दाऊद, फारुकी, शेख हसन कासकर, दाऊद हसन, शेख कासकर, दाऊद हसन शेख, इब्राहिम कासकर, इब्राहिम मेमन आदी नावांचा समावेश आहे.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com