Amit Gorkhe Fitness: नियमित सूर्यनमस्कार, योगासनांमुळे तंदुरुस्त! असा आहे अमित गोरखेंचा फिटनेस फंडा

BJP MLA Amit Gorkhe Fitness: नेत्यांचा फिटनेस: मला राजकारणामध्येही ही शिकवण उपयोगी पडली आहे. खोखोमध्ये धावणाऱ्या खेळाडूचा पाठलाग करत असताना, त्याची धावण्याची गती आणि तो कोणत्या पद्धतीने धावेल, याचा विचार करावा लागतो.
BJP MLA Amit Gorkhe Fitness
BJP MLA Amit Gorkhe FitnessSarkarnama
Published on
Updated on

नियमित खेळ आणि व्यायाम यामुळे मन प्रसन्न राहते, शरीर तंदुरुस्त राहते आणि सामाजिक कार्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळते, असे मत विधान परिषदेतील भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केले. आमदारकीच्या जबाबदाऱ्या सांभाळतानाच आरोग्याकडेही त्यांचे विशेष लक्ष असते.

निरोगी शरीर आणि शांत मन यामुळे कोणतेही काम करण्याची ताकद वाढत असते. विशेषतः समाजकार्यासारख्या क्षेत्रामध्ये सक्रिय असणाऱ्या व्यक्तीसाठी यातूनच नव्या कामाची ऊर्जा मिळत असते. मन स्थिर राहते, तेव्हा निर्णयक्षमता वाढते. त्यामुळे आमदारकीच्या भूमिकेत अधिक परिणामकारकपणे काम करता येते, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.

मी रोज सकाळी अर्धा तास सूर्यनमस्कार, योगासने आणि हलके पळणे असा व्यायाम करतो. कधीकधी क्रिकेटचा सरावही करतो. हा नित्यक्रम अनेक दिवसांपासून नियमितपणे करत आहे. क्रिकेट व मैदानी खेळांबरोबरच कॅरमवर माझे विशेष प्रेम आहे.

दैनंदिन व्यायाम करण्याबरोबरच खेळांची आवडही जपण्याचा प्रयत्न मी केला आहे. यातील प्रत्येक खेळ मला आनंद आणि शरीराला व्यायाम देतोच, त्याचबरोबर रोजच्या आयुष्यासाठीही वेगवेगळ्या गोष्टी शिकवत असतो. मला कॅरम, क्रिकेट, हॉलीबॉल आणि खोखो हे खेळ विशेष आवडतात.

कॅरमने एकाग्रता वाढते, क्रिकेटने सहकार्य आणि नेतृत्व विकसित होते. खोखो हा खेळ मला विशेष वाढते. यामध्ये दमसास आणि चपळतेचा कस लागतोच, त्याचबरोबर सांघिकतेला असणारे महत्त्व आपल्याला लक्षात येते. समोरच्या संघातील एखादा खेळाडू कितीही चपळ असला, चलाख असला, तरीही आपण संघातील सर्व खेळाडू मिळून त्याला बाद करू शकतो. ही सांघिकतेची खरी शिकवण आहे.

मला राजकारणामध्येही ही शिकवण उपयोगी पडली आहे. खोखोमध्ये धावणाऱ्या खेळाडूचा पाठलाग करत असताना, त्याची धावण्याची गती आणि तो कोणत्या पद्धतीने धावेल, याचा विचार करावा लागतो. त्याचा अंदाज घेऊनच योग्य वेळी साथीदाराला दिला, तर त्याला बाद करणे शक्य होते.

ही गोष्ट पाठलाग करणाऱ्या खेळाडूबरोबरच आपल्या अन्य साथीदारांनाही लक्षात यावे लागते. काही सेकंदांमध्ये आपल्या सर्वांमध्येच समान विचार व्हावा लागतो आणि गरजेप्रमाणे समन्वयही लागतो. त्यातूनच सांघिता आणि निर्णयक्षमता विकसित होत असते. राजकारणातील एखाद्या विषयावर निर्णयक्षमता आणि सर्व सहकाऱ्यांचे सहकार्य यांची गरज असते. त्यासाठी हा गुण नक्कीच फायद्याचा ठरतो.

प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये निरोगी शरीर हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे तरुणांनी रोज किमान अर्धा तास कोणताही खेळ खेळला पाहिजे. त्यातून सांघिकता, शिस्त आणि जबाबदारी यांची जाणीव मनामध्ये विकसित होते. कोणतीही स्पर्धा जिंकणे महत्त्वाचे नसते, तर स्पर्धेसाठी आपण केलेली तयारी महत्त्वाची असते आणि त्यातून व्यक्तिमत्त्व घडत असते.

बालपणापासूनच मुलांमध्ये नेतृत्व विकसित होण्यासाठी खेळ हा महत्त्वाचा पैलू असतो. त्यामुळे खेळाडू घडविणे आवश्‍यक असते आणि शिक्षणाबरोबरच खेळांनाही महत्त्व द्यायला हवे. यासाठीच मी ‘नॉव्हेल इंटरनॅशनल’ ही संस्था सुरू केली आहे. ही केवळ शिक्षण देणारी संस्था नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, क्रीडा-संस्कार आणि सामाजिक जाण निर्माण करणारा उपक्रम आहे.

BJP MLA Amit Gorkhe Fitness
Manoj Jarange live: सरकारने गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता मुंबई सोडणार नाही!

या संस्थेमार्फत राबविले जातात. भावी पिढी सक्षम करण्यासाठी विद्यार्थ्यांना खेळांमध्ये भाग घेणे व शारीरिक तंदुरुस्ती या विषयांवर प्रोत्साहन देण्यात येते. शाळा-महाविद्यालयांमध्ये फुटबॉल, खोखो, कबड्डी, व्हॉलिबॉल, बॅडमिंटन यांसारख्या खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. वर्षभर आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा घेतल्या जातात. खेळाडूंना प्रशिक्षक, किट, प्रवास भत्ता अशा सर्व सुविधाही दिल्या जातात.

(शब्दांकन : जयंत जाधव)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com