Hemant Rasane: तासभर मतदारसंघात पायी फिरणे, हीच आरोग्याची गुरूकिल्ली, असा आहे हेमंत रासने यांचा फिटनेस फंडा

Hemant Rasane Fitness Funda: मतदारसंघात चालत फिरल्यामुळे कुठे कचरा पडला आहे, अनधिकृत फ्लेक्स लागले आहेत का, नवीन अतिक्रमण झाले असेल तर लगेच तेथून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन लावला जातो.
Hemant Rasane Fitness Funda
Hemant Rasane Fitness FundaSarkarnama
Published on
Updated on

रात्री झोपण्यास कितीही उशीर झाला, तरी सकाळी साडेसहा वाजता दिवसाची सुरुवात होते. सातच्या सुमारास चालायला सुरुवात केल्यानंतर तासभर मतदारसंघात पायी फिरणे, हाच माझा प्रमुख व्यायाम आहे, असे पुणे शहरातील कसबा पेठ मतदारसंघाचे भाजपचे आमदार हेमंत रासने सांगत होते.

गोड आवडत असले तरी चहातील साखर पूर्ण बंद केली आहे. केवळ शाकाहारी जेवणे, तेही सकाळी आणि रात्री घरीच जेवायचे, बाहेरचे खाणे बऱ्यापैकी बंद केले आहे, हेच रासने यांच्या निरोगी आरोग्याचे कारण आहे.

पुणे शहर कितीही विस्तारले असले तरी कसबा पेठ मतदारसंघ म्हणजेच शेकडो वर्षांची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख जपणारा हा भाग आहे. जुने वाडे, अरुंद गल्ल्या या जुन्या पुण्याचे साक्षीदार आहेत. अशा मतदारसंघाचे आरोग्यही चांगले राहिले पाहिजे यासाठी आमदार हेमंत रासने यांचे प्रयत्न सुरू आहेत.

विधानसभेची निवडणूक होण्यापूर्वी रासने यांचे वजन खूप वाढले होते. त्यावेळी त्यांनी व्यवस्थित डायट प्लॅन तयार करून घेतला. खाण्यापिण्यावर पूर्णपणे नियंत्रण आणले आणि ११ किलो वजन कमी केले. त्यामुळे त्यांचे शरीर एकदम फिट झाले. आमदार झाल्यानंतर कामाचा व्याप वाढला आहे, अशा स्थितीत रासने हे पुण्यात असले की रोज सकाळी सात वाजता घरातून चालण्यासाठी बाहेर पडतात.

Hemant Rasane Fitness Funda
Sharad Pawar NCP: आणखी एका काँग्रेस नेत्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

सदाशिव पेठेतील घरापासून चालण्यास सुरुवात केल्यानंतर टिळक रस्ता, टिळक चौक, कुमठेकर रस्त्याने सरळ बाजीराव रस्त्यावर महाराष्ट्र बँकेपर्यंत चालत येतात. तेथून पुन्हा बाजीराव रस्त्याने चालत रेणुकास्वरूप शाळेपर्यंत चालत येतात. सुमारे तासभर चालताना साडेचार पाच किलोमीटरचे अंतर पूर्ण होते.

मतदारसंघात चालत फिरल्यामुळे कुठे कचरा पडला आहे, अनधिकृत फ्लेक्स लागले आहेत का, नवीन अतिक्रमण झाले असेल तर लगेच तेथून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन लावला जातो. त्यांना या अनधिकृत गोष्टीवर त्वरित कारवाईचे आदेश देऊन त्याचे फोटो पाठविण्यास सांगितले जाते. सकाळी रस्त्यावर वाहतूक कमी असते, अशा वेळी चालत फिरल्यामुळे माझा व्यायामही होतो आणि मतदारसंघातील चुकीच्या गोष्टींकडे लक्ष जाते. त्यामुळे मतदारसंघाचीही तब्येत बरी राहते, असे आमदार हेमंत रासने यांनी नमूद केले आहे.

Hemant Rasane Fitness Funda
'गडकरी ते रोडकरी'; RSS स्वयंसेवक ते कार्यक्षम केंद्रीय मंत्री

आठवड्यातील काही दिवस मुंबईमध्ये मुक्काम होतो, तेव्हा सकाळी सकाळी मरीन ड्राइव्हवर चालण्याची मजा वेगळीच आहे. पुण्यापेक्षा जास्त चालणे तेथे होते. प्रवास असला तरी मी सकाळचे चालणे सहसा टाळत नाही. हा माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचा व्यायाम आहे, त्यामुळे मला दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते.

सूर्यनमस्कार अन् योगासने

महिन्यातील काही दिवस शनिवार पेठेतील वर्तक बागेत जातो. तेथे सूर्यनमस्कारचे तीन सेट करतो. हा व्यायाम मला नियमित करता येत नाही, पण काही दिवस आवर्जून करतो. योगासनेही करतो. त्यामुळे माझे शरीर व मन दोन्ही प्रसन्न राहते, असे रासने यांनी सांगितले.

सकारात्मक विचार

मी कायम वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे बाकीच्या वायफट गोष्टींकडे लक्ष जात नाही, कामावर लक्ष केंद्रित होते, त्याचा परिणाम म्हणून मतदारसंघात अनेक सुधारणा होत आहेत. सकारात्मक विचार करणे, मन प्रसन्न ठेवणे यावर माझा भर आहे. त्यामुळे तब्येत चांगली राहते. मला गाणी ऐकायला खूप आवडते, त्यामुळेही चांगले वाटते, असे रासने यांनी सांगितले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com