शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे त्यांनी १९८०च्या दशकात शिवसेनेत प्रवेश केला. शाखाप्रमुखापासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली.
कठोर मेहनत, धडाडी, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आणि प्रत्येक कामाला शेवटापर्यंत घेऊन जाण्याची धमक या वैशिष्ट्यांमुळे ते मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले.
शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे येथील किसननगर येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण ठाणे येथील मंगला हायस्कूल येथे झाले. 18 वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला.
ठाण्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी शिवसेनेत जोडली जात होती. त्यादरम्यान त्यांनी शिवसेना नेते आनंद दिघे यांची भेट घेतली, ही भेट त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. किसननगर येथील शाखेचे ते शाखाप्रमुख झाले.
गरीब परिस्थितीमुळे त्यांना त्यावेळी शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला ऑटो रिक्षा चालवली. 1997 मध्ये ते ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले. 2001 मध्ये ते ठाणे महापालिका सभागृहात विरोधी पक्षनेते झाले.
एकनाथ शिंदे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. नगरसेवक असताना एका अपघातात त्यांनी त्यांचा 11 वर्षांचा मुलगा आणि सात वर्षांची मुलगी गमावली. त्यांचा दुसरा मुलगा श्रीकांत त्यावेळी 13 वर्षांचा होता. श्रीकांत हे आज शिवसेनेचा खासदार आहेत.
२००४ साली बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा उमेदवारी दिली. या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील सरकार कोसळलं. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिंदेंवर असणाऱ्या विश्वासामुळे एक एक करत आमदार सुरत मार्गे गुवाहाटीला गेले.
शिवसेनेचे चौथे मुख्यमंत्री तर महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्विकारला आहे. याआधी शिवसेनेचे मनोहर जोशी, नारायण राणे, उद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांना हा मान मिळाला होता.